BANvsSL : ‘बेबी मलिंगा’च्या जाळ्यात बांगलादेशचा कॅप्टन, कुसल मेंडिसचा खरतनाक कॅच, पाहा Video

Asia Cup BAN vs SL : आशिया कपमधील श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यामध्ये दुसरा सामना चालू आहे. या सामन्यामध्ये पाथिराना ज्याला बेबी मलिंगा म्हणून ओळखलं जातं त्याने् शाकिबला आपल्या जाळ्यात अडकवलं.

BANvsSL : 'बेबी मलिंगा'च्या जाळ्यात बांगलादेशचा कॅप्टन, कुसल मेंडिसचा खरतनाक कॅच, पाहा Video
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 6:43 PM

मुंबई : अशिया कप 2023 मधील दुसरा सामना श्रीलंका आणि बांगलादेश या दोन संघांमध्ये सुरू आहे. बांगलादेश संघाने प्रथम टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांची सुरुवात एकदम खराब झालेली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये बांगलादेशला पहिला झटका बसला, महेश तीक्ष्णाने तन्झिद हसन याला शून्यावर माघारी पाठवलं. त्यानंतर आठव्या ओव्हरमध्ये बांगलादेशचा दुसरा गडी बाद झाला. मोहम्मद नईमला अवघ्या 16 धावांवर धनंजया डी सिल्वाने आऊट केलं.

दोन विकेट गेल्या होत्या त्यावेळी बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन हा संघाचा डाव सावरणार असं वाटत होतं. मात्र श्रीलंकेचा बेबी मलिंग म्हणून ओळखला जाणारा महेश पथिराणाने त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं. शाकिब 20 धावांवर माघारी परतला. या विकेटमागे कीपरची मेहनत महत्त्वाची ठरली. कुसल मेंडिस याने कमाल कॅच घेतला आणि धोकादायक शाकिबला आऊट केलं.

श्रीलंका संघाचे मुख्य खेळाडू बाहेर

दिलशान मदुशंका, लाहिरु कुमारा, वानिंदु हसरंगा आणि दुष्मंथा चमीरा हे मुख्य खेळाडू दुखापतीमुळे बाहेर आहेत. त्यामुळे श्रीलंका संघा पहिल्यापेक्षा काहीस कमकुवत आहे. श्रालंकेप्रमाणे बांगलादेश संघाचेही दोन मुख्य खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. बांगलादेशचा डाव 164 धावांवर आटोपला यामध्ये पाथिरानाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.

श्रीलंका प्लेईंग इलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश तीक्ष्णा, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.

बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.