PAK vs IND Reserve Day | पाकिस्तान-टीम इंडिया सोमवारी पुन्हा भिडणार, राखीव दिवशी सामना रद्द होणार?
IND vs PAK Colombo Weather Report 11 September | टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीनंतर सुपर 4 मधील सामनाही रद्द होणार? जाणून घ्या कोलंबोत सोमवारी कसं असेल हवामान?
कोलंबो | टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2023 सुपर 4 मधील सामना रविवारी 10 सप्टेंबरला पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे आऊटफील्ड खेळण्याच्या क्षमतेची राहिली नाही. त्यामुळे आता हा सामना सोमवारी 11 सप्टेंबरला राखीव दिवशी होणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. पावसाचं सावट पाहूनच एसीसीने खबरदारी म्हणून पाक-टीम इंडिया आणि आशिया कप फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेतलेला.
कोलंबोत जोरदार पावसाचा अंदाज
कोलंबोत सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, 11 सप्टेंबरला पाऊस होण्याची 90 टक्के शक्यता आहे.इतकंच नाही, तर दिवसभर ताशी15 ते 30 किमी वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता आहे. सोमवारीही खेळ पूर्ण न झाल्यास नाईलाजाने सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. सोमवारी किमान 20 ओव्हरचा खेळ होऊ शकतो. पावसाच्या व्यत्ययामुळे सोमवारीही सामना पूर्ण होऊ शकला नाही तर काय, असा प्रश्न क्रीडा विश्वात उपस्थित केला जात आहे. सामना रद्द झाल्यास टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघाना प्रत्येकी समसमान 1-1 पॉइंट देण्यात येईल.
आतापर्यंत सामन्यात काय झालं?
दरम्यान या सामन्यात टीम इंडियाने पावसाच्या एन्ट्रीआधी 24.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 147 रन्स केल्या. टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी 121 रन्सची पार्टनरशीप केली. या दोघांनी हाफ सेंच्युरी केली. ही सलाम जोडी चांगल्या सुरुवातीनंतर सलग 2 ओव्हरमध्ये आऊट झाली. रोहितने 56 आणि गिलने 58 रन्स केल्या. तर त्यानंतर केएल राहुल आणि विराट नाबाद आहेत.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.