SL vs BAN Super 4 | बागंलादेशचा ‘करो या मरो’ सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, प्लेईंग इलेव्हनमध्ये कोण?
Sri Lanka vs Bangladesh Super 4 Asia Cup 2023 | बांगलादेश क्रिकेट टीमसाठी श्रीलंका विरुद्धचा सामना हा आरपारचा आहे. बांगलादेशला आव्हान कायम राखण्यासाठी जिंकावंच लागणार आहे.
कोलंबो | आशिया कप 2023 सुपर 4 मधील दुसरा सामना आज 9 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येत आहे. या सामन्यात श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. श्रीलंकेचा हा सुपर 4 मधील पहिला तर बांगलादेशचा दुसरा सामना आहे. बांगलादेशला सुपर 4 मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे बांगलादेशसाठी श्रीलंका विरुद्धचा सामना हा ‘करो या मरो’ असा आहे. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकला आहे. कॅप्टन शाकिब अल हसन याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
श्रीलंका आणि बांगलादेश टीम
बांगलादेशने या अतिशय महत्त्वाच्या सामन्यसााठी टीम प्लेईंग इलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. बॅटिंग ऑलराउंडर अफीफ होसेन याच्या जागी डावखुरा गोलंदाज नसूम अहमद याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. तर श्रीलंकेने आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवत कोणताही बदल केलेला नाही. दासून शनाका याच्याकडे श्रीलंका क्रिकेट टीमंचं कर्णधारपद आहे. तर शाकीब बांगलादेशचं नेतृत्व सांभाळतोय
बांगलादेशने टॉस जिंकला
Get ready for an electrifying showdown as Bangladesh takes on Sri Lanka | Super Four (D/N) 🏏#BCB | #Cricket | #AsiaCup | #BANvSL pic.twitter.com/HMohkwuz5K
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 9, 2023
आशिया कपमध्ये कोण सरस?
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आतापर्यंत आशिया कप इतिहासात 10 वेळा आमनेसामने आले आहेत. या 10 सामन्यांमध्ये श्रीलंका सरस ठरली आहे. श्रीलंकाने 10 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर बांगलादेशला 3 मॅच जिंकता आल्या आहेत. तर श्रीलंकेतील कोलंबमधील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये 2022 पासून ते आतापर्यंत एकूण 4 सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी पहिली बॅटिंग करणारी टीम 2 वेळा, तर विजयी धावांचा पाठलाग करणारी टीम 2 वेळा जिंकली आहे. त्यामुळे आता या पाचव्या सामन्यात निकाल कोणत्या टीमच्या बाजूने जातो, याकडे लक्ष असणार आहे.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), मोहम्मद नईम, लिटॉन दास, तोहिद हृदाय, शमिम होसेन, मुशफिकर रहिम (विकेटीपर), अफीफ होसेन, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, शोरिफूल इस्लाम आणि हसन महमुद.