…म्हणून Jaspreet Bumrah याची आशिया कपमधून माघार, समोर आलं मोठं कारण!

Jaspreet Bumrah News : आशिया कपमधून बुमराह असा अचानक माघारी परतल्याने मोठा गोंधळा उडाला आहे.  मात्र बुमराह अशा कोणत्या कारणासाठी मुंबईत परतलाय. अशातच मोठी माहिती समोर आलीये.

...म्हणून Jaspreet Bumrah याची आशिया कपमधून माघार, समोर आलं मोठं कारण!
Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Sep 03, 2023 | 11:15 PM

मुंबई : टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह मायदेशी परतल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या 11 महिन्यांपासून जसप्रीत बुमराह दुखापीतमुळे संघाच्या बाहेर होता. आता आशिया कपमध्ये परत एकदा संघात त्याने जागा मिळवल्याने टीम इंडियाचे चाहतेही खूश झाले होते. मात्र एकही चेंडू न टाकता बुमराह असा अचानक माघारी परतल्याने मोठा गोंधळा उडाला आहे.  मात्र बुमराह अशा कोणत्या कारणासाठी मुंबईत परतलाय. याबाबत सोशल मीडियावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशातच मोठी माहिती समोर आलीये.

जसप्रीत बुमराह याने आयर्लंड दौऱ्यामध्ये कमबॅक केलं होतं. तीन टी-20 सामन्यांची मालिका झाली होती. जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपदाची मोठी जबाबदारी दिली होती. त्याच्यासोबत सर्व युवा खेळाडू होते, या मालिकेमध्ये बुमराहने आपली ताकद दाखवून दिली होती. टीम इंडियाने ही मालिका 2-0 ने जिंकली होती. या मालिकेतील एक सामना रद्द करण्यात आला होता. दोन सामन्यांमध्ये बुमराहने सर्वात कमी धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. या मालिकेमध्ये त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलेलं.

आयर्लंड मालिकेनंतर जसप्रीत बुमराहची आशिया कपमध्ये निवड झाली होती. सर्व क्रिकेट चाहत्यांना यॉर्कर किंगच्या येण्याने आनंद झाला होता. भारत-पाक हाय-व्होल्टेज सामन्यात बुमराहला बॉलिंग करताना पाहण्यासाठी सर्वजण आतूर झाले होते. टीम इंडियाने बॅटींग केली आणि त्यामध्ये बुमरहाने तीन चौकार मारले होते. मात्र त्यानंतर पावसाने सर्व डाल विस्कटला, भारत-पाक सामना रद्द करावा लागला. बुमराहची बॉलिंग राहिली आणि सगळंच राहून गेलं.

टीम इंडियाचा उद्या नेपाळविरूद्ध सामना असताना बुमराह माघारी परतला आहे.  याबाबत असं बोललं जात आहे की,  जसप्रीत बुमराहच्या घरी लवकरच एक छोटा पाहुणा येणार असून तो तीन दिवसांसाठी घरी आला आहे. बुमराह बापमाणूस होणार असल्याने तो आशिया कपमधील नेपाळविरूद्धच्या सामन्यात दिसणार नाही. मात्र तो सुपर 4 मधील सामन्यांसाठी संघात जॉईन होणार आहे.

रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.