IND vs PAK : भारत पाकिस्तान सामन्यात हे 11 खेळाडू ठरतील लकी, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि इतर बाबी
Asia Cup 2023, IND vs PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याची क्रीडाप्रेमींना उत्सुकता आहे. या सामन्यात कोणते खेळाडू चमकदार कामगिरी करतील, ते जाणून घ्या.
मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार? हे सांगणं कठीण आहे. मात्र या सामन्यात काही खेळाडू चमकदार कामगिरी शकतात. त्यांचा फॉर्म पाहता त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. पाकिस्तानने हा सामना जिंकला तर थेट अंतिम फेरीत एन्ट्री मारणार आहे. दुसरीकडे, भारताला हा सामना जिंकत अंतिम फेरीची वाट सोपी करण्याची संधी आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 128 वनडे सामने झाले आहेत. यात पाकिस्तानने 73, तर भारताने 55 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे पाकिस्तानचं पारडं जड आहे असं मानलं जातं. पण भारतीय संघही तोडीस तोड कामगिरी करण्यास सक्षम आहे. चला जाणून घेऊयात पिच रिपोर्ट आणि इतर बाबी
पिच रिपोर्ट
भारत पाकिस्तान सामना श्रीलंकेच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये आहे. हे मैदान फलंदाजीसाठी फायदेशीर आहे. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकात विकेट मिळवण्यासाठी धडपड करावी लागेल. तसेच फिरकीपटू मधल्या षटकात बाजी पालटू शकतात. पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 260 धावा करू शकतो. तसेच या मैदानावर विजयी आव्हान गाठणं कठीण असल्याचं दिसून आलं आहे. आतापर्यंत धावांचा पाठलाग करताना विजयी टक्केवारी ही 40 टक्के इतकी आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
पाकिस्तान – फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आघा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरीस रौफ.
हे खेळाडू ठरतील लकी
विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्याकडून या सामन्यात अपेक्षा आहेत. तर शादाब खान, इमाम उल हक, नसीम शाह, कुलदीप यादव चांगली कामगिरी करू शकतात. त्यामुळे दोन लकी इलेव्हन ठरू शकता.
लकी 11 (1) : मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), बाबर आझम, शुबमन गिल, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शादाब खान, मोहम्मद सिराज, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.
लकी 11 (2) : मोहम्मद रिझवान, इशान किशन, विराट कोहली, बाबर आझम, शुबमन गिल, रवींद्र जडेजा (उपकर्मधार), हार्दिक पांड्या (कर्णधार), शादाब खान, मोहम्मद सिराज, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.