Asia Cup 2023 | एकही वनडे न खेळलेल्या क्रिकेटरची आशिया कपसाठी टीम इंडियात निवड
Asia Cup 2023 India Squad | बीसीसीआयने दिग्गजांना वगळून टीममध्ये एकही वनडे मॅच न खेळलेल्या युवा खेळाडूची आशिया कपसाठी निवड केली आहे
नवी दिल्ली | आगामी आशिया कपसाठी बीसीसीआय निवड समितीने 17 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली आहे. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि कॅप्टन रोहित शर्मा यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित आगरकर यांनी 17 जणांची नावं वाचून दाखवली. आशिया कपमधून दुखापतीनंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांचं कमबॅक झालं. तर शिखर धवन आणि युजवेंद्र चहल या दोघांच्या पदरी निराशा पडली. मात्र एकही वनडे मॅच न खेळेल्या 20 वर्षीय खेळाडूची टीममध्ये सरप्राईज एन्ट्री झाली आहे.
निवड समितीने 20 वर्षांच्या तरण्याबांड तिलक वर्मा याच्यावर विश्वास दाखवत त्याला टीममध्ये संधी दिली आहे. तिलक वर्मा याने आतापर्यंत फक्त 7 टी 20 सामने खेळले आहेत. तिलकने वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. तिलक विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेत टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. तिलकने पहिल्या टी 20 सीरिजमध्ये निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आणि संधी द्यायला भाग पाडलं.
आशिया कप 2023 साठी टीम इंडिया
Here’s the Rohit Sharma-led team for the upcoming #AsiaCup2023 🙌#TeamIndia pic.twitter.com/TdSyyChB0b
— BCCI (@BCCI) August 21, 2023
तिलक वर्मा याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
तिलक वर्मा याने आतापर्यंत 7 टी 20 सामन्यांमध्ये 138.1 स्ट्राईक रेट आणि 34.8 च्या एव्हरेजने 1 अर्धशतकासह 174 धावा केल्या आहेत. तसेच 1 विकेटही घेतली आहे.
6 टीम आणि 1 ट्रॉफी
दरम्यान यंदा आशिया कपमध्ये एकूण 6 संघ आमनेसामने भिडणार आहेत. यंदा नेपाळ क्रिकेट टीमनेही आशिया कपसाठी क्वालिफाय केलंय. त्यामुळे आता टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश अफगाणिस्तान आणि नेपाळ या संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया 2 सप्टेंबरपासून आशिया कप मोहिमेला सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचा पहिलाच सामना हा पाकिस्तान विरुद्ध असणार आहे. तर त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजेच 5 सप्टेंबरला टीम इंडिया नेपाळ विरुद्ध भिडणार आहे.
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
स्टँडबाय | संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)