Asia Cup 2024 : अफगाणिस्तानचं भारतासमोर 206 धावांचं तगडं आव्हान, टीम इंडिया लक्ष्य गाठणार का?

एसीसी मेन्स टी20 इमर्जिंग टीम एशिया कप 2024 स्पर्धेच्या उपांत्य अफगाणिस्तानने टीम इंडियासमोर विजयासाठी धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता हे आव्हान टीम इंडिया गाठणार का? याकडे लक्ष लागून आहे.

Asia Cup 2024 : अफगाणिस्तानचं भारतासमोर 206 धावांचं तगडं आव्हान, टीम इंडिया लक्ष्य गाठणार का?
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 8:46 PM

आशिया कप 2024 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने भारतीय गोलंदाजांची पिसं काढली असं म्हणायला हरकत नाही. अफगाणिस्तानने पहिल्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली. झुबैद अकबारी आणि सेदिकुल्लाह अटल याने जबरदस्त खेळी केली. त्यामुळे अफगाणिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. दरम्यान झुबैद अकबारी 41 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 64 धावा करून बाद झाला. त्यानंतर सेदिकुल्लाह अटल याने वादळी खेळी सुरुच ठेवली. 204 च्या स्ट्राईक रेटने 83 धावा केल्या. याता त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले. त्यामुळे अफगाणिस्तानची धावसंख्या 180 पार गेली होती. अफगाणिस्तानच्या खेळीमुळे भारताचं टेन्शन वाढत होतं. दरम्यान, रसिख सलामने सलग दोन विकेट अफगाणिस्तानला रोखण्याचा प्रयत्न केला. पण या दोन्ही विकेट 18व्या षटकात आल्या. त्यामुळे अफगाणिस्तानचं काम तिथपर्यंत झालं होतं. करीम जनतने त्यानंतर मोर्चा सांभाळला. 20 चेंडूत तुफान फटकेबाजी करत  41 धावा केल्या. भारतीय गोलंदाज फक्त हतबल दिसत होते. अफगाणिस्तानने 10.3 च्या रनरेटने धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताला विकेट सांभाळून बोर्डवर धावा लावाव्या लागणार आहेत.

भारताकडून रसिख दार सलामने 3, तर अकिब खानने एक विकेट घेतली. दरम्यान अफगाणिस्तानने 20 षटकात 4 गडी गमवून 206 धावा केल्या आहेत. तसेच विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे भारतीय संघ अफगाणिस्तानने दिलेलं आव्हान गाठणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला. दरम्यान, श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. पाकिस्तानने श्रीलंकेसमोर 136 धावांचं आव्हान दिलं होतं . हे आव्हान 16.3 षटकात श्रीलंकेने पूर्ण केलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

इंडिया अ (प्लेइंग इलेव्हन) : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (कर्णधार), आयुष बडोनी, नेहल वढेरा, रमणदीप सिंग, निशांत सिंधू, अंशुल कंबोज, राहुल चहर, रसिक दार सलाम, आकिब खान.

अफगाणिस्तान अ (प्लेइंग इलेव्हन): सेदीकुल्ला अटल, झुबैद अकबरी, दरविश रसूली (कर्णधार), मोहम्मद इशाक (विकेटकीपर), करीम जनात, शाहिदुल्ला कमाल, शराफुद्दीन अश्रफ, अब्दुल रहमान, अल्लाह गझनफर, कैस अहमद, बिलाल सामी

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.