Asia Cup 2024 : बांग्लादेशने मलेशियाचा 114 धावांनी उडवला धुव्वा, उपांत्य फेरीचं गणित अजूनही जर तर वर

आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बांग्लादेशचं स्थान अजूनही निश्चित नाही. थायलंड आणि बांग्लादेश यांच्यात उपांत्य फेरीसाठी चुरस आहे. नेट रनरेटमध्ये बांग्लादेश संघ मागे होता. मात्र मलेशियाला 114 धावांनी पराभूत दोन गुणांसह नेट रनरेटसही सुधारला आहे. पण श्रीलंका आणि थायलंड सामन्यानंतरच उपांत्य फेरीचं गणित सुटणार आहे.

Asia Cup 2024 : बांग्लादेशने मलेशियाचा 114 धावांनी उडवला धुव्वा, उपांत्य फेरीचं गणित अजूनही जर तर वर
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 24, 2024 | 5:13 PM

आशिया कप स्पर्धेत अ गटात उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान या संघांनी धडक मारली आहे. आता उपांत्य फेरीसाठी ब गटातून श्रीलंका, बांग्लादेश आणि थायलंड यांच्यात चुरस होती. बांग्लादेशने मलेशियाला मोठ्या फरकाने पराभूत करत आपलं उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्कं केलं आहे. महत्त्वाच्या सामन्यात बांग्लादेशने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. बांग्लादेश संघाने 20 षटकात 2 गडी गमवून 191 धावा केल्या आणि विजयासाठी 192 धावांचं आव्हान दिलं. मात्र हे आव्हान गाठताना मलेशियन संघाची चांगलीच दमछाक झाली. मलेशियाला 20 षटकात 8 गडी गमवून 77 धावा करता आल्या. बांग्लादेशकडून दिलारा अक्तरने 33, मुर्शिदा खातुनने 80, निगार सुल्तानाने नाबाद 62 आणि रुमाना अहमदने नाबाद 6 धावा केल्या. विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मलेशियन संघाने नांगी टाकली. इल्सा हंटर वगळता एकही खेळाडू मोठी धावसंख्या करू शकली नाही. तिने 20 धावा केल्या.

बांग्लादेशने मलेशियाला 114 धावांनी पराभूत करत नेट रनरेटमध्ये जबरदस्त उसळी घेतली आहे. बांग्लादेशचा संघ 4 गुण आणि +1.971 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर श्रीलंकन संघ 4 गुण आणि +4.243 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत श्रीलंकेचं स्थान जवळपास पक्कं आहे. पण बांग्लादेश आणि थायलंडमध्ये काँटे की टक्कर आहे. बांग्लादेशने नेट रनरेट सुधारला असला तरी थायलंडकडेही संधी आहे हे विसरून चालणार नाही.

या सामन्यापूर्वी श्रीलंका 4 गुण आणि +4.243 नेट रनरेटसह पहिल्या, थायलंड 2 गुण आणि +0.098 नेट रनरेटसह दुसऱ्या, तर बांग्लादेश 2 गुण आणि -0.024 रनरेटसह तिसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे बांग्लादेशला नुसता विजय नाही नेट रनरेटही सुधारणं गरजेचं होतं. कारण थायलंडने श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तर नेट रनरेट खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आता श्रीलंका विरुद्ध थायलंड या सामन्याकडे नजर असणार आहे. हा सामना श्रीलंकेने जिंकला तर थायलंडचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. पण थायलंडने श्रीलंकेला पराभूत केलं तर मात्र सर्व गणित नेट रनरेटवर येऊन ठेपेल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

बांगलादेश महिला (प्लेइंग इलेव्हन): दिलारा अक्तर, मुर्शिदा खातून, इश्मा तंजीम, रितू मोनी, रुमाना अहमद, निगार सुलताना (विकेटकीपर/कर्णधार), राबेया खान, शोर्ना अक्टर, जहांआरा आलम, नाहिदा अक्टर, सबिकुन नहर.

मलेशिया महिला (प्लेइंग इलेव्हन): विनिफ्रेड दुराईसिंगम (कर्णधार), वान ज्युलिया (डब्ल्यू), एल्सा हंटर, नूर आयशा मोहम्मद इक्बाल, माहिराह इज्जती इस्माईल, आइना हमिझाह हाशिम, आयना नजवा, ऐस्या एलिसा, सुआबिका मनिवन्नन, नूर इज्जातुल स्याफीका, इर्डिना बे नबिल

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.