IND vs SL : आशिया कप जिंकण्यासाठी भारताला 51 धावांची गरज, मोहम्मद सिराजकडून श्रीलंकेचा खुर्दा
IND vs SL : आशिया कपच्या फायनल सामन्यात भारताच्य गोलंदाजांनी श्रीलंका संघाचा धुव्वा उडवून टाकला आहेय. आशिया कप जिंकण्यासाठी भारताला 51 धावांची गरज आहे.
मुंबई : आशिया कपचा फायनल सामना श्रीलंका आणि भारतामध्ये सुरू आहे. टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रालंका संघाचा डाव अवघ्या 50 धावांवर आटोपला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेच्या संघाने शरणागती पत्करली. मोहम्मद सिराज याच्या 6 विकेट आणि हार्दित पंड्याच्या 3 विकेट्सने श्रीलंकेचा डाव 50 धावांवर गडगडला. आशिया कपचा फायनल सामना सुरू आहे असं कुठेही वाटलं नाही. भारताला आशिय कप जिंकण्यासाठी 51 धावा करायच्या आहेत.
टॉस जिंकत श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय श्रीलंकेवरट उलटा पडल्याचं दिसलं. पाथुम निसांका आणि कुसल परेराा ओपनिंगला उतरले होते, जसप्रीत बुमराहने पहिल्याच ओव्हरमध्ये संघाला पहिली विकेट मिळवून दिली. बुमराहने नारळ फोडून दिल्यावर मोहम्मद सिराजे सुपारी घेतल्यासारखी त्याने बॉलिंग केली.
सिराजने पहिली ओव्हर मेडन टाकली त्यानंतर आपल्य दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने राडा केला. सिराजने दुसऱ्या ओव्हरमध्ये एक दोन नाहीतर चार विकेट्स घेतल्या. गडी इतक्यावरत थांबला नाही पुढच्या ओव्हरमध्ये त्याने कर्णधार शनाकालाही बोल्ड करत आपल्या 5 विकेट्स पूर्ण केल्या. एकाच ओव्हरमध्ये चार विकेट घेणारा मोहम्मद सिराज पहिला खेळाडू ठरला आहे. इतकंच नाहीतर अवघ्या 16 बॉलमध्ये त्याने पाच विकेट घेतल्यात.
दरम्यान, भारताकडून मोहम्मद सिराज याने 6 विकेट्स, हार्दिक पंड्या 3 आणि जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (Wk), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (Wk), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (C), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना