Suryakumar Yadav : : 6,6,6,0,6 आणि…. ! सूर्यकुमार यादवची शेवटच्या ओव्हरमध्ये सुपर्ब फटकेबाजी

सूर्यकुमार यादवने 68 धावांची खेळी केली. अवघ्या 26 धावांमध्ये सूर्यकुमार यादवने तब्बल 251.54च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. यात 6 फोर आणि तितकेच सिक्सही मारले. या 6 सिक्स पैकी चार सिक्स तर एका ओव्हरमध्ये मारले होते.

Suryakumar Yadav : : 6,6,6,0,6 आणि.... ! सूर्यकुमार यादवची शेवटच्या ओव्हरमध्ये सुपर्ब फटकेबाजी
सूर्यकुमार यादवImage Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 10:01 PM

दुबई : सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), ज्याला स्काय म्हणून ओळखलं जातं, त्याने आपल्या बॅटिंगचा सुरेख नजराणा हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात दाखवला. अखेरच्या ओव्हरमध्ये सूर्याने शानदार चार सिक्स मारले. त्यातील पहिले तीन सिक्स हे पहिल्या तीन बॉलवरच आले होते. त्यामुळे युवराजने (Yuvraj Singh 6 Sixes against Sixes) जी कमाल इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात करुन दाखवली होती, तीच पुन्हा पाहायला मिळते की काय, असं चाहत्यांना दोन मिनिटं वाटून गेलं. पण चौथा बॉल ओव्हरचा डॉट केला आणि ती संधी हुकली. पण पाचव्या बॉलवर सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा सिक्स (Suryakumar Yadav Sixes) मारला. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या पाच बॉल्समध्येच त्याने 30 धावा कुटल्या होत्या. त्यामुळे गोलंदाजावर वेगळाच दबाव आला असता, तर आश्चर्य वाटायला नको. तसा तो आलाही होता. पण 20व्या ओव्हरचा शेवट करताना बोलंदाजाने कमबॅक केलं. सिक्स किंवा फोर जाणार नाही, याची काळजी घेतली. शेवटच्या बॉलवर सिक्स फोर गेला नसला, तरी आपल्या रनिंग बिटवीन द विकेट्सने दोन धावा फटाफट पूर्ण केल्या होत्या.

पाहा व्हिडीओ :

सूर्यकुमार यादवने 68 धावांची खेळी केली. अवघ्या 26 धावांमध्ये सूर्यकुमार यादवने तब्बल 251.54च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. यात 6 फोर आणि तितकेच सिक्सही मारले. या 6 सिक्स पैकी चार सिक्स तर एका ओव्हरमध्ये मारले होते. के एल राहुलच्या विकेटनंतर सूर्यकुमार यादव बॅटिंगसाठी उतरला होता. त्याने शेवटपर्यंत टिकून राहत भारताला एका अवाढव्य धावसंख्येपर्यंत पोहोचवलं.

अवघ्या 42 बॉल्समध्ये 98 रन्सची भागिदारी

विराटची सूर्याला दाद

विराट कोहलीच्या साधीने शानदार भागीदारी रचन सूर्यकुमारने भारताचा स्कोअर 190च्या पार नेला. विराट कोहलीनेही अर्धशतकी पारी खेळत दमदार फलंदाजी केली. 192 धावा भारताने अवघ्या 2 विकेट गमावून केल्या होत्या. त्याआधी सूर्यकुमारने 36 आणि रोहित शर्माने 21 धावा केल्या होत्या. आशिया कपमध्ये भारताने पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. त्यानंतर दुसरा सामना हाँगकाँग विरुद्ध खेळताना सूर्यकुमार यादवने आपला फॉर्म कायम ठेवलाय. तर विराट कोहलीचंही जुनं रुप चाहत्यांना पुन्हा एकदा अनुभवता आलंय.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.