IND vs PAK : पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला झटका, ‘हा’ विकेटकीपर खेळणारच नाही!
Asia Cup ind vs pak 2023 : आजच्या सामन्यात पाकिस्तान संघाने विजय मिळवला तर ते सुपर फोर मध्ये एन्ट्री मारणार आहेत. या सामन्याआधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे.
मुंबई : आशिय कप 2023 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. 2019 नंतर पहिल्यांदाच वन डे क्रिकेट फॉरमॅटमध्ये आमने-सामने येणार आहेत. टीम इंडियाचा आशिया कपमधील हा पहिलाच सामना असून पाकिस्तान संघाचा दुसरा सामना असणार आहे. नेपाळ संघाचा पहिल्या सामन्यामध्ये पाकिस्तानने पराभव केलाय. आजच्या सामन्यात पाकिस्तान संघाने विजय मिळवला तर ते सुपर फोर मध्ये एन्ट्री मारणार आहेत. या सामन्याआधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर खेळाडू खेळणार नसल्याने त्याची उणीव भासणार आहे.
कोण आहे तो खेळाडू?
हा खेळाडू के. एल. राहुल असून पहिल्य दोन सामन्यांमध्ये तो खेळणार नसल्याची माहिती कोच राहुल द्रविड यांनी दिली होती. के. एल. राहुलच्या जागी मुंबई इंडिअन्सचा खेळाडू ईशान किशन याला संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र टीमसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
के. एल. राहुलच्या परतण्याने संघ संतुलित झाला होता मात्र राहुलच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा मॅनेजमेंटची गोची झाली. ईशान किशन याची कीपर म्हणून संघात निवड झाली की श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्यामध्ये कोणाला संधी दिली जाईल यावरूनही मोठा संभ्रम आहे. तर सामन्याच्या 19 तासअगोदर पाकिस्तान संघाने आपली प्लेइंग 11 जाहीर केली आहे.
बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रऊफ.
भारत संपूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (VC), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराज, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन