Asian Cup 2022 : आशिया कप 2022च्या यजमानपदावर लवकरच निर्णय, या देशात होईल स्पर्धा, अधिक जाणून घ्या…
श्रीलंकेतील परिस्थितीमुळे अनेक बदल होण्याची चिन्हे आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) विविध सदस्य मंडळांकडून मिळालेल्या माहितीनुसार 16 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे स्थलांतर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
नवी दिल्ली : आशिया कप 2022चे (Asian Cup 2022) भवितव्य दिवसेंदिवस बदलत असल्याचे दिसते. कारण, श्रीलंकेतील राजकीय घडामोडी यथास्थितीऐवजी बदलाचे संकेत देत आहेत.अशा स्थितीत सहा संघांची महाद्वीपीय स्पर्धा म्हणजेच आशिया कप श्रीलंकेतून बाहेर काढला जाण्याची जोरदार चिन्हे आहेत. आशिया चषकाच्या या मोसमाचे यजमानपद श्रीलंकेकडे आहे. पण, आता ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE मध्ये आयोजित केली जाऊ शकते. श्रीलंकेतील परिस्थितीमुळे अनेक बदल होण्याची चिन्हे आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) विविध सदस्य मंडळांकडून मिळालेल्या माहितीनुसार 16 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे स्थलांतर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. Cricbuzz च्या मते, ACC आणि Emirates क्रिकेट बोर्ड (ECB) यांच्यात UAE मध्ये चर्चा झाली. एसएलसीला लूपमध्ये ठेवले जात आहे. आशिया चषक 26 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत आधी जाहीर केल्यानुसार त्याच तारखांना आयोजित करणं अपेक्षित आहे.
श्रीलंकेतील परिस्थिती
श्रीलंका क्रिकेट अर्थात SLC ची सध्याची परिस्थिती काही आठवड्यांपूर्वी होती त्यापेक्षा वेगळी आहे. जेव्हा सरकारच्या दबावाखाली श्रीलंका क्रिकेट बोर्डानं या स्पर्धेचे आयोजन करण्यास सहमती दर्शवली होती. गेल्या आठवड्यात गोष्टी मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. देशाच्या राष्ट्रपती पळून गेले आणि नवीन अध्यक्ष बसवला गेले आहेत. राजकीय आस्थापनांच्या विरोधात हिंसक निदर्शनं श्रीलंकेच्या परिस्थितीला मारक बनली आहे.
एसीसीचं काय मत?
शनिवारी एसीसी सदस्याने क्रिकबझला सांगितलं की, ‘अशा परिस्थितीत चॅम्पियनशिप आयोजित करणं योग्य नाही असं वाटतं. ‘बदलाची दाट शक्यता असल्याचं एसएलसीच्या अधिकाऱ्यानं मान्य केलं आहे. योगायोगानं SLCनं संपूर्ण मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचं यशस्वी आयोजन केलं आहे आणि सध्या पाकिस्तान संघाचे यजमानपद भूषवत आहे.
पीसीबीनं काय म्हटलंय?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं दिलेल्या निवेदनात वेगळेच चित्र दिसत आहे. बोर्डानं सांगितले की, “श्रीलंकेला पाठिंबा देणे आणि तेथे आशिया चषक खेळणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे. जर ही स्पर्धा श्रीलंकेत झाली नाही तर त्यांचे क्रिकेटचे मोठे आणि आर्थिक नुकसान होईल. ऑस्ट्रेलियाच्या नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात कोणत्याही अडचणीशिवाय पाकिस्तानचा संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे.