Rinku Singh | जिंकलंस पोरा, सिलिंडर डिलीव्हरी करणाऱ्या बापाचे पांग फेडलेस, रिंकू सिंह याची टीम इंडियात निवड

Rinku Singh Team India | रिंकू सिंह याची वेस्ट इंडिज विरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत निवड करण्यात न आल्याने क्रिकेट चाहत्यांम्ये नाराजी होती. मात्र अखेर रिंकूची एशियन गेम्ससाठी बोलावणं आलं आहे.

Rinku Singh | जिंकलंस पोरा, सिलिंडर डिलीव्हरी करणाऱ्या बापाचे पांग फेडलेस, रिंकू सिंह याची टीम इंडियात निवड
Image Credit source: KKR Twitter
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 5:13 PM

मुंबई | जिद्द, स्वत:वर असलेला ठाम विश्वास आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास काहीही अशक्य नाही, हे रिंकू सिंह याने पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलंय. रिंकूने घरोघरी सिलिंडर डिलिव्हरी करणाऱ्या आपल्या बापाचे पांग फेडलेत. आपण ज्या प्रत्येक घरात सिलिंडर डिलिव्हरी करतो, त्या घरातील प्रत्येक टीव्हीत आता आपला मुलगा दिसणार, बाप म्हणून ही भावना काही औरच आहे. आयपीएल 16 व्या मोसमात केकेआरला शेवटच्या 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकून अशक्य असा विजय मिळवून देणाऱ्या रिंकूची अखेर टीम इंडियात निवड झालीय. घरची हलाखीच्या स्थितीतून पुढे आलेल्या रिंकूने क्रिकेटर व्हायचं स्वप्न फक्त पाहिलंच नाही, तर पूर्ण ही करुन दाखवलं.

एशियन गेम्स 2023 स्पर्धेला 23 सप्टेंबरपासून चीनमध्ये हांगझोऊ इथे सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने शुक्रवारी 14 जुलै रोजी भारतीय संघ जाहीर केला. ऋतुराज गायकवाड टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर रिंकू याच टीमचा एक भाग असणार आहे. रिंकूची टीम इंडियात निवड झाल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने एक सोशल मीडिया पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये रिंकूचा एक फोटो हा टीम इंडिया आणि दुसरा फोटो केकेआर जर्सीतला आहे. टीममध्ये निवड झाल्याने रिंकूचं सोशल मीडियावर भरभरुन कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

रिंकूची टीम इंडियात निवड

रिंकूच्या कारकीर्दीतील टर्निंग पॉइंट

रिंकू आयपीएलमध्ये 2018 पासून आयपीएलमध्ये खेळतोय. मात्र रिंकू खऱ्या अर्थाने आयपीएल 16 व्या मोसमात लोकप्रिय झाला. रिंकू एका सामन्याने घराघरात पोहचला. रिंकूने कोलकाता नाईट रायडर्सला गुजरात टायटन्स विरुद्ध रोमहर्षक विजय मिळवून दिला. केकेआरला विजयासाठी 5 बॉलमध्ये 29 धावांची गरज असताना रिंकूने सलग 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकून सनसनाटी विजय मिळवून दिला होता. तेव्हापासून रिंकू हिरो ठरला. रिंकूचे हे 5 सिक्स त्याच्या क्रिकेट कारकीर्दीला कलाटणी देणारे ठरले.

रिंकूची आयपीएल कारकीर्द

रिंकूने आतापर्यंत एकूण 5 हंगामात 31 सामने खेळले आहेत. रिंकूने या 31 सामन्यांमध्ये 54 चौकार, 38 खणखणीत षटकार आणि 4 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 725 धावा केल्या आहेत.

एशियन गेम्ससाठी टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर).

राखीव खेळाडू | यश ठाकूर, साई किशोर, दीपक हुडा, व्यंकटेश अय्यर आणि साई सुदर्शन.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.