Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये भारत विरुद्ध मलेशिया पहिला टी20 सामना, कुठे पाहता येणार सामना जाणून घ्या

Asian Games 2023,India vs Malaysia : एशियन गेम्सला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना मलेशियाशी होणार आहे. कधी आणि कुठे पाहता येणार सामना ते पाहुयात..

Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये भारत विरुद्ध मलेशिया पहिला टी20 सामना, कुठे पाहता येणार सामना जाणून घ्या
Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये भारताचा पहिला टी20 सामना मलेशियाशी, जाणून घ्या सर्व डिटेल्स
Follow us
| Updated on: Sep 20, 2023 | 8:51 PM

मुंबई : एशियन गेम्स 2023 स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. भारतीय महिला क्रिकेट एशियन गेम्समध्ये डेब्यू करणार आहे. यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघने 2022 कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभाग घेतला होता. तेव्हा टीम इंडियाला रजत पदकावर समाधान मानावं लागलं होतं. एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदाचा दावेदार आहे. चीनच्या हांगडूमध्ये भारतीय महिला संघ गुरुवारी मलेशियासोबत उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ उपांत्य फेरीत धडक मारणार आहे. हरमनप्रीत कौर हीने बांगलादेश दौऱ्यात गैरवर्तन केल्याने तिच्या दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हरमनप्रीत या सामन्यात नसेल. भारत आणि मलेशिया यांच्या 21 सप्टेंबरला हांग्जोतील झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी पिंगफेंग क्रिकेट मैदानात खेळला जाईल.

भारत विरुद्ध मलेशिया सामना किती वाजता आणि कुठे पाहाता येईल?

एशियन गेम्स 2023 मध्ये भारत विरुद्ध मलेशिया संघात भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता सामना सुरु होणार आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे एशियन गेम्स 2023 च्या प्रसारणाचे अधिकार आहेत. भारत विरुध्द मलेशिया सामना सोनी स्पोर्ट्स1 (इंग्रजी), सोनी स्पोर्ट्स 2 (हिंदी) आणि सोनी स्पोर्ट्स 4 (तमिळ) वर पाहता येईल. तसेच सोनीलिव अॅपव आणि वेबसाईटवर हा सामना पाहता येईल.

एशिनयन गेम्स 2023 वेळापत्रक

  • उपांत्यपूर्व फेरी 1 : 21 सप्टेंबर 2023, भारत विरुद्ध मलेशिया (सकाळी 6 वाजून 30 मिनिटे)
  • उपांत्यपूर्व फेरी 2 : 21 सप्टेंबर 2023, पाकिस्तान विरुद्ध इंडोनेशिया (सकाळी 11 वाजून 30 मिनिटे)
  • उपांत्यपूर्व फेरी 3 : 22 सप्टेंबर 2023, श्रीलंका विरुद्ध थायलंड (सकाळी 6 वाजून 30 मिनिटे)
  • उपांत्यपूर्व फेरी 4 : 22 सप्टेंबर 2023, बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग (सकाळी 11 वाजून 30 मिनिटे)
  • उपांत्य फेरी 1 : 24 सप्टेंबर 2023,उपांत्यपूर्व फेरी 1 विजेता आणि उपांत्यपूर्व फेरी 4 विजेता (सकाळी 6 वाजून 30 मिनिटे)
  • उपांत्य फेरी 2 : 24 सप्टेंबर 2023,उपांत्यपूर्व फेरी 2 विजेता आणि उपांत्यपूर्व फेरी 3 विजेता (सकाळी 11 वाजून 30 मिनिटे)
  • कास्य पदकसाठी लढत: 25 सप्टेंबर 2023,उपांत्य फेरी 1 पराभूत संघ आणि उपांत्य फेरी 2 पराभूत (सकाळी 6 वाजून 30 मिनिटे)
  • अंतिम फेरी 1 : 24 सप्टेंबर 2023,उपांत्य फेरी 1 विजेता आणि उपांत्य फेरी 4 विजेता (सकाळी 11 वाजून 30 मिनिटे)

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटसाठी भारताचा संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, देविका वैद्य, तितास साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मनी, कनिका आहुजा, उमा चेत्री (विकेटकीपर), अनुषा बरेड्डी, पूजा वस्त्राकर.

खेळाडू स्टँडबाय : हरलीन देओल, कशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.