IND vs MAL Asian Games 2023 : भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये दाखल, चीनमध्ये शेफाली वर्माचं वादळ!

India Women vs Malaysia Women, Asian Games 2023 : एशियन गेम्स 2023 मध्ये भारतीय महिला संघाचा आणि मलेशिया महिला संघाचा सामना पार पडला. हा सामना पावसामुळे रद्द झाला असून भारतीय महिला संघाने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.

IND vs MAL Asian Games 2023 : भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये दाखल, चीनमध्ये शेफाली वर्माचं वादळ!
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 3:38 PM

मुंबई : एशियन गेम्स 2023 महिला क्रिकेटमध्ये भारत आणि मलेशिया यांच्यात सामना पार पडला. या सामन्यामध्येही पावसानाे खोडा घातल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. पावसामुळे हा सामना15- 15 ओव्हर्सचा करण्यात आला होता, मात्र पावसाने मलेशियाच्या बॅटींगवेळी हजेरी लावली. अखेर पंचांनी हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिला संघाने सेमीफानलमधील आपलं स्थान पक्क केलं आहे.

सामन्याचा धावता आढावा

मलेशियाच्या संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यामध्ये स्मृती मंधानाकडे कर्णधारपदाची जबाबदारी होता. पावसाने हजेरी लावल्यामुळे हा सामना 15- 15 ओव्हर्सचा करण्यात आला होता. भारतीय महिला संघाची दमदार सुरूवात झालेली, स्मृती आणि शेफालीने 57 धावांची सलामी करून दिली होती. 27 धावांवर असताना स्मृती मंधाना आऊट झाली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या जेमिमा रॉड्रिग्जने आक्रमक खेळी करत मलेशियाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला.

शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या 47 बॉलमध्ये 86 धावांची भागीदारी केली. शेफाली वर्माने 39 बॉलमध्ये 67 धावा केल्या यामध्ये 4 चौकार आणि 5 षटकार मारले. तर जेमिमाने 29 बॉलमध्ये नाबाद 47 धावांची खेळी केली. ऋचा घोषनेही अवघ्या 7 बॉलमध्ये 21 धावा केल्या, यामध्ये 3 चौकार आणि 1 सिक्स मारला. भारतीय महिला संघाने 15 ओव्हर्समध्ये 173 धावा करत मलेशियाला 174 धावांचं आव्हान दिलं होतं.

दरम्यान, भारतीय महिला संघाच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मलेशिया संघ मैदानात उतरला मात्र दुसऱ्याच ओव्हरमध्ये पावसाने हजेरी लावला. काही वेळ वाट पाहिली मात्र त्यानंतर अखेर सामना रद्द करण्यात आला.

मलेशिया महिला (प्लेइंग इलेव्हन): आइन्ना हमिझाह हाशिम, विनिफ्रेड दुराईसिंगम (C), मास एलिसा, वान ज्युलिया (W), माहिरा इज्जती इस्माईल, आयना नजवा, वान नॉर झुलैका, नूर अरियाना नाटस्या, ऐसिया एलिसा, नूर दानिया स्युहादा, निक नूर अटीला

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (C), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, कनिका आहुजा, रिचा घोष (W), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, मिन्नू मणी, राजेश्वरी गायकवाड.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.