Asian Games 2023 मध्ये यशस्वी जयस्वाल याने वादळी शतक ठोकत रचला इतिहास, अशी कामगिरी करणार पहिलाच खेळाडू!
Yashasvi Jaiswal Hundred in Asian Games 2023 : एशियन गेम्स 2023मध्ये भारत आणि नेपाळमध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये यशस्वी जयस्वाल याने शतक केलं आहे. पठ्ठ्याने पहिल्या ओव्हरपासूनच नेपाळच्या गोलंदाजांना रिमांडमध्ये घेतलं होतं. या शतकासह जयस्वालने विक्रमाला गवसणी घातली आहे.
मुंबई : चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स 2023मध्ये भारत आणि नेपाळमधील सुरु असलेल्या सामन्यामध्ये भारताचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल याने शतक केलं आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 202-4 धावा केल्या. सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने 48 चेंडूत शतक करत इतिहास रचला आहे. यशस्वीनंतर स्टार खेळाडू रिंकू सिंग याने आपला दांडपट्टा फिरवत 15 चेंडूत 37 धावा केल्या. नेपाळच्या संघाला जिंकण्यासाठी 203 धावांचं आव्हान आहे.
या विक्रमाला घातली गवसणी
आयपीएलनंतर वेस्ट इंडिजविरूद्धच्या दौऱ्यात आपला शतकांचा ‘सिलसिला’ यशस्वीने कायम ठेवला आहे. यशस्वीने अवघ्या 4८ चेंडूंमध्ये 100 धावा केल्या. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 7 षटकार मारले. या शतकासह यशस्वी भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. एशियन गेम्समध्ये शतक करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
भारतासाठी कमी चेंडूत शतक करणारे खेळाडू-
रोहित शर्मा- 35 चेंडू सूर्यकुमार यादव- 45 चेंडू केएल राहुल- 46 चेंडू यशस्वी जैस्वाल- 48 चेंडू सूर्यकुमार यादव- 48 चेंडू
शतक करणारा सर्वात युवा खेळाडू-
यशस्वी जैस्वाल- 21 वर्षे 279 दिवस शुभमन गिल- 23 वर्षे 146 दिवस सुरेश रैना- २३ वर्षे १५६ दिवस
पाहा व्हिडीओ-
THE HISTORICAL MOMENT:
Yashasvi Jaiswal the youngest T20i centurion for India and the first Indian to score a hundred in a multi-sports event. pic.twitter.com/PzFVxjxrCW
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 3, 2023
भारत (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड (C), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, जितेश शर्मा (W), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग
नेपाळ (प्लेइंग इलेव्हन): कुशल भुर्तेल, आसिफ शेख (W), संदीप जोरा, गुलसन झा, रोहित पौडेल (C), कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरी, सोमपाल कामी, करण केसी, अविनाश बोहरा, संदीप लामिछाने