IND vs BAN Semi Final | टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने, कोण जिंकणार?
IND VS BAN ASIAN GAMES 2023 Semi Final | टीम इंडिया आणि बांगलादेश या दोन्ही संघांना सिलव्हर मेडल निश्चित करण्याची संधी आहे. मात्र जिंकणार कोणतीतरी एक टीम. हा सामना जिंकणारी टीम अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.
होंगझोऊ | एशियन गेम्स 2023 स्पर्धत मेन्स क्रिकेट टीम इंडिया 6 ऑक्टोबर रोजी सेमी फायनल सामना खेळणार आहे. टीम इंडियासमोर बांगलादेशचं आव्हान असणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर सकाळी 6 वाजता टॉस होईल. हा सामना होंगझोऊमधील पिंगफेस कॅम्पस क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघ सिलव्हर मेडलसाठी मैदानात उतरतील. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या सामन्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. ऋतुराज गायकवाड टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर सैफ हसन बांगलादेशं नेतृत्व करेल.
आकडेवारी कुणाच्या बाजूने?
टीम इंडिया आणि बांगलादेश आतापर्यंत एकूण 12 वेळा आमनेसामने आले आहेत. हे दोन्ही संघ 2009 मध्ये पहिल्यांदा आमनेसामने आले होते. टीम इंडिया आतापर्यंत बांगलादेशवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर एकूण 11 वेळा विजय मिळवला आहे. तर बांगलादेशला फक्त एकदाच जिंकता आलंय. आता हे आकडे आरपारच्या सामन्यात महत्त्वाचे ठरत नाहीत. मात्र कधी काय होईल सांगता येत नाही.
खेळपट्टी कशी आहे?
होंगझोऊची खेळपट्टी ही फलंदाजासाठी मदतशीर आहे. मैदान लहान असल्याने फलंदाज सहज मोठे फटके मारु शकतात. याच मैदानात नेपाळने मंगोलिया विरुद्ध 20 ओव्हरमध्ये 314 धावा करत वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. यावरुन अंदाज बांधता येईल की या पीचवर गोलंदाजांना चांगलाच चोप मिळणार आहे.
एशियन गेम्स 2023 टीम इंडियाचं शुक्रवारचं वेळापत्रक
Whether it’s #Cricket, #Hockey #Badminton, #Kabaddi or #Wrestling, #AsianGames2023 has it covered🙌
Don’t miss a day of non-stop sporting action at #AsianGames2023 🔥
Watch all the drama , tomorrow – 6:30 AM onwards, LIVE on #SonyLIV 📱 #HangzhouAsianGames #AsianGames pic.twitter.com/q4IIN2K7Ny
— Sony LIV (@SonyLIV) October 5, 2023
एशियन गेम्ससाठी टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), शिवम दुबे आणि आकाश दीप.
एशियन गेम्स 2023 साठी बांग्लादेश क्रिकेट टीम | सैफ हसन (कॅप्टन), झाकेर अली (विकेटकीपर), महमुदुल हसन जॉय, मोसाद्देक हुसैन, परवेज हुसैन एमोन, शहादत हुसैन, यासिर अली, जाकिर हसन, रिपन मंडल, मृत्युंजय चौधरी, रकीबुल हसन, रिशाद हुसैन, सुमोन खान, तनवीर इस्लाम आणि अफीफ हुसैन.