Ind vs Ban Asian Games : टीम इंडियाच्या पोरांची फायनलमध्ये धडक, भारताचं आणखी एक सुवर्ण फिक्स?

IND vs BAN Semi Final Asian Game : एशियन गेम्सच्या सेमी फायनल सामन्यामध्ये भारतीय संघाने बांगलादेशवर विजय मिळवला आहे. कॅप्टन ऋतुराज आणि तिलक वर्मा यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना धू धू धूतलं. या विजयासह भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Ind vs Ban Asian Games : टीम इंडियाच्या पोरांची फायनलमध्ये धडक, भारताचं आणखी एक सुवर्ण फिक्स?
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 11:58 AM

मुंबई : एशियन गेम्सच्या सेमीफायनलमध्ये (Asian Game IND vs BAN) टीम इंडियाने बांगलादेशवर 9 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने फायनलमध्ये प्रवेश करत एशियन गेम्समध्ये आणखी एक पदक निश्चित केलंय. बांगलदेशने दिलेल्या 97 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या भिडूंनी 10 व्या ओव्हरमध्येच हे आव्हान पूर्ण करत सामना संपवला. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा यांच्या नाबाद खेळीने सामना सहज खिशात घातला.

सामन्याचा संपूर्ण आढावा

टॉस जिंकत टीम इंडियाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. भारताच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला, बांगलादेश संघाने 20 ओव्हरमध्ये 96-9 धावा केल्या. बांगलादेशच्या सात खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. जाकेक अली याने सर्वाधिक २४ धावा आणि परवेझ हुसैन इमॉन नाबाद 23 धावा केल्या. भारताच्या साई किशोर याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

भारतीय संघ फलंदाजीला उतरल्यावर मागील सामन्यातील शतकवीर यशस्वी जयस्वाल एकही धाव न करता माघारी परतला. भारताला सामना कठीण होतो की काय असं वाटत होतं. मात्र कर्णधार ऋतुराज गायकवाडने २६ बॉलमध्ये नाबाद ४० धावा आणि तिलक वर्माने नाबाद ५५ धावा केल्या. दोघांनीही बांगलादेशच्या गोलंदाजांना सळो को पळो करून सोडलं. या विजयासह भारताने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

बांग्लादेश (प्लेइंग इलेव्हन): परवेझ हुसैन इमॉन, महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, सैफ हसन (C), अफिफ हुसैन, शहादत हुसेन, जाकेर अली (W), रकीबुल हसन, हसन मुराद, मृत्युंजॉय चौधरी, रिपन मंडोल

भारत (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (C), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, जितेश शर्मा (ऐ), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, रविश्रीनिवासन साई किशोर, अर्शदीप सिंग

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.