IND vs AUS : कसोटी सामन्यात भारताची दाणादाण, ऋतुराज गायकवाड आणि नितीश रेड्डीला भोपळा

भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए संघात कसोटी मालिका सुरु आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. असं असताना पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात भारताची दाणादाण उडाली आहे. संपूर्ण संघ अवघ्या 107 धावांवर तंबूत परतला आहे.

IND vs AUS : कसोटी सामन्यात भारताची दाणादाण, ऋतुराज गायकवाड आणि नितीश रेड्डीला भोपळा
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 1:40 PM

टी20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियाची गाडी रुळावरून घसरल्याचं चित्र आहे. श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिकेनंतर न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिकाही गमावली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. असं असताना टीम इंडियाचं भवितव्य असलेल्या खेळाडूंकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाची दाणादाण उडाल्याचं चित्र आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात इंडिया ए संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्यच होता असं म्हणावं लागेल. कारण एकही फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर तग धरू शकला नाही. भारताचं खातंही उघडलं नसताना कर्णधार ऋतुराज गायकवाड शून्यावर बाद झाला. त्यानंतर खेळपट्टीवर हजेरी लावून पॅव्हेलियनमध्ये परताची स्पर्धा सुरु झाल्याचं दिसून आलं.

रणजी ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा अभिमन्यू ईश्वरन अवघ्या 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांनी काही अंशी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. साई सुदर्शन 21 धावा, तर देवदत्त पडिक्कल 36 धावा करून बाद झाले. त्यानंतर पुन्हा एकेरी धावा करत तंबूत परतण्याची चढाओढ सुरु झाली. इतकंच काय तर नितीश रेड्डीला आपलं खातंही खोलता आलं नाही. इंद्रजीथ 9 धावा, विकेटकीपर फलंदाज इशान किशन 4, तर मानव सुथार 1 धावा करून तंबूत परतले.

तळाशी आलेल्या नवदीप सैनीने त्यातल्या त्यात 23 धावा केल्या. त्यामुळे धावसंख्या 100 च्या पार जाण्यास मदत झाली. प्रसिद्ध कृष्णाला आपलं खातंही खोलता आलं नाही. शून्यावर बाद होणारा तिसरा फलंदाज ठरला. भारताने 47.4 षटकांचा सामना करत सर्व गडी गमवून 107 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ब्रेंडन डोगेटने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. जॉर्डन बकिंघम 2, फर्गस क्यू नेल 1, तर मर्फीने 1 गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत ए (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू इसवरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, बाबा इंद्रजीथ, इशान किशन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, मानव सुथार, नवदीप सैनी, प्रसीद कृष्णा, मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलिया ए (प्लेइंग इलेव्हन): सॅम कोन्स्टास, मार्कस हॅरिस, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, नॅथन मॅकस्विनी (कर्णधार), ब्यू वेबस्टर, कूपर कोनोली, जोश फिलिप (विकेटकीपर), फर्गस ओ नील, टॉड मर्फी, ब्रेंडन डॉगेट, जॉर्डन बकिंगहॅम

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.