AUS vs AFG Pitch Report : अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाविरूद्ध ‘ही’ स्ट्रॅटेजी वापरली तर निकाल बदलू शकतो, जाणून घ्या

AUS vs AFG : वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघ एकमेकांना भिडत आहेत. या सामन्यामध्ये अफगाणिस्तानसाठी विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळे आकडेवारी पाहता त्यांना टॉस घेतल्यावर काय फायद्याचं ठरणार जाणून घ्या.

AUS vs AFG Pitch Report : अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 'ही' स्ट्रॅटेजी वापरली तर निकाल बदलू शकतो, जाणून घ्या
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 12:30 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये आज अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांना भिडणार आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलिया संघ आजचा सामना जिंकला तर सेमी फायलनमध्ये जाणारा तिसरा संघ ठरेल. अफगाणिस्तान संघ जीव ओतून खेळताना दिसेल, कारण या सामन्यात उलटफेर केला तर अफगाणिस्तान संघ सेमी फायनलमध्ये आपली जागा भक्कम करेल. हा सामना मुंबईतील वानखेडे होणार आहे. पिच रिपोर्ट कसा आहे जाणून घ्या.

वानखेडे मैदानाचा पिच रिपोर्ट

आतापर्यंतचा सामने पाहिले तर वानखेडे मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला चांगला फायदा झाला आहे. कारण गेल्या तीन सामन्यांची आकडेवारी पाहिली तर या मैदानावर 399, 382 आणि 357 धावा केल्या आहेत. या लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र दुसऱ्या संघाची मात्र अवस्था एकदम बेकार झाली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये जो संघ टॉस जिंकेल तो प्रथम फलंदाजी करताना दिसेल. अफगाणिस्तान संघाची ताकद स्पिनर्स आहेत तर कांगारूंची ताकद त्यांची वेगवान बॉलिंग आहे.

अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया दोन संघांची हेड टू हेड आकडेवारी पाहिली तर वर्ल्ड कपमध्ये दोनवेळा आमने सामने आले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये कांगारूंनी बाजी मारली असून आज इतिहास बदलणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघ जोश इंग्लिस (विकेटकीपर), पॅट कमिन्स (C), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी

अफगाणिस्तान संघ हशमतुल्ला शाहिदी (C), इकराम अलीखिल रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, नूर अहमद, नजीबुल्ला झदरन, नवीन-उल-हक, अब्दुल रहमान, रियाझ हसन

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.