AUS vs IND : 21 वर्षीय भारतीय ऑलराउंडर डेब्यूसाठी ‘रेडी’, पर्थमध्ये संधी मिळण्याची शक्यता
Australia vs India 1st Test : बांगलादेशविरुद्ध टी 20i डेब्यू करुन आपली छाप सोडणाऱ्या टीम इंडियाच्या ऑलराउंडरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पर्थ येथे पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. उभयसंघातील कसोटी मालिकेतील पहिला सामना हा 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियासाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने अतिशय महत्त्वाची आहे. भारताला डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहचायचं असेल तर ही मालिका 4-1 ने जिंकावी लागणार आहे. त्यामुळे ही मालिका भारतासाठी करो या मरो अशीच आहे. त्यात पहिल्या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत उपकर्णधार असलेला जसप्रीत बुमराह नेतृत्व करणार आहे. पर्थ कसोटीत टीम इंडियाचा 21 वर्षीय बॅटिंग ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीश कुमार रेड्डी याच्याकडे टीम मॅनेजमेंट चौथ्या बॉलरच्या हिशोबाने पाहत आहे. पर्थमधील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी पूरक आहे. त्यामुळे टीम इंडियाची बॉलिंग साईड आणखी मजबूत व्हावी आणि शेवटपर्यंत बॅटिंगचा पर्याय उपलब्ध असावा, या दोन्ही बाजूने विचार करुन नितीशचा समावेश करण्याचा विचार सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.
बांगलादेशविरुद्ध टी 20i पदार्पण
नितीश कुमार रेड्डी याने मायदेशात बांगलादेशविरुद्ध टी 20i पदार्पण केलं. नितीशने 3 टी 20i सामन्यांमध्ये 1 अर्धशतकासह 90 धावा केल्या. तर 3 विकेट्सही घेतल्या. नितीशने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केलं.
फर्स्ट क्लासमधील आकडे
दरम्यान नितीशने आतापर्यंत 23 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांसह 779 धावा केल्या आहेत. तसेच नितीशने 56 विकेट्सही घेतल्या आहेत. नितीशची एका सामन्यात 119 धावांच्या मोबदल्यात 8 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
नितीश टेस्ट डेब्यू करणार!
Nitish Kumar Reddy is likely to make his Debut in the Perth Test. [Devendra Pandey (pdevendra) from The Indian Express] pic.twitter.com/G3q2Q08LF0
— Johns. (@CricCrazyJohns) November 17, 2024
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.