IND vs AUS : पॅट कमिन्सला पराभव जिव्हारी, थेट खेळाडूंनाच ओढलं, पाहा व्हीडिओ
Pat Cummins Disappoint AUS vs IND 1st Test : टीम इंडियाने पर्थमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर धमाकेदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याला हा लाजीरवाणा पराभव जिव्हारी लागला.
भारतीय क्रिकेट संघाने पर्थ येथे ऑस्ट्रेलियावर पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्याच दिवशी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 534 धावांचा पाठलाग करताना 238 धावांवर आटोपला. टीम इंडियाने यासह 295 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. टीम इंडियाचा हा ऑस्ट्रेलियातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय ठरला. तसेच इंडिया पर्थमधील ओपट्स स्टेडिममध्ये विजय मिळवणारी पहिलीच व्हीजीटींग टीम ठरली. टीम इंडियाने गाबानंतर पर्थमध्ये कांगारुंचा माज उतरवला. ऑस्ट्रेलियाचा हा लाजीरवाणा पराभव कर्णधार पॅट कमिन्स याला चांगलाच जिव्हारी लागला. कॅप्टन पॅट कमिन्स याने पराभवानंतर सर्वच बोलून दाखवलं.
पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाच्या या पराभवाचा धक्का सहन करु शकला नाही. पॅटने अशाप्रकारच्या पराभवाचा विचारही केला नसेल. पॅटने या पराभवानंतर अनुभवी खेळाडूंना ओढलं. सराव करताना सर्व चांगले खेळत होते. सामन्याआधी तयारीही झाल्याचं चित्र होतं. मात्र प्रत्यक्ष सामन्यात काही बरोबर झालं नाही, असं पॅटचं म्हणणं आहे.
पॅट कमिन्स काय म्हणाला?
“हे फार निराशाजनक आहे.आमची या सामन्याआधी सर्व तयारी झालीय असं आम्हाला वाटत होतं. सर्व चांगले खेळत होते. खूप काही गोष्टी बरोबर झाल्या नाहीत. आम्ही स्वत:ला संधी दिली नाही. पहिल्या दिवशी बॅटिंग केली असती तर दुसऱ्या दिवशी चित्रं वेगळं असतं”, असं पॅट म्हणाला.
कॅप्टन पॅट कमिन्स लाजीरवाण्या पराभवामुळे नाराज
“Not an ideal way to start the summer” – Pat Cummins reflects on Australia’s heavy defeat against India in Perth 🗣️ #AUSvIND pic.twitter.com/uDWr5jYsRa
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 25, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवुड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.