AUS vs IND : मी कधीही खेळायला तयार, Cheteshwar Pujara मुळे कांगारुंना टेन्शन, निवड समिती संधी देणार?
Cheteshwar Pujara Team India : टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने कॉमेंट्री बॉक्समधून पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढवलं आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील प्रतिष्ठेच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्याला पर्थ स्टेडियमध्ये सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून कर्णधार जसप्रीत बुमराह याने बॅटिंगचा निर्णय घेतला. नितीश रेड्डी आणि हर्षित राणा या दोघांनी पदार्पण केलं. रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियासाठी केएल राहुल याने यशस्वी जयस्वाल याच्यासह सलामी दिली. सलामी जोडी खेळत असताना टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि समालोचक चेतेश्वर पुजारा याने कॉमेंट्री बॉक्समधून ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढवलं. मी कधीही खेळायला तयार आहे, असं म्हणत पुजाराने खेळण्याची इच्छा व्यक्त केली.
नक्की काय झालं?
चेतेश्वर पुजारा टीम इंडियापासून गेली अनेक महिने दूर आहे. त्याची या बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठीही निवड करण्यात आली नाही. मात्र पुजारा या मालिकेसाठी समालोचक म्हणून सहभागी झाला आहे. टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली. पहिल्या डावातील दुसऱ्या ओव्हरमध्ये समालोचक जतीन सप्रू याने चेतेश्वर पुजारा याची ओळख करुन देत त्याचं कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत केलं. “चुकून तु सफेद कपडे घातलेस तर ऑस्ट्रेलियाला घाम फुटेल”, असं जतीन सप्रू पुजाराला उद्देशून म्हणाला. यावर चेतेश्वर पुजाराने मनातील इच्छा व्यक्त केली. “बॅटिंग करने के लिए मै कभीभी तैयार है”, असं पुजारा म्हणाला.
चेतेश्वर पुजाराची आता या मालिकेसाठी निवड होण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र पुजाराने त्याची मनातील इच्छा व्यक्त केली. तसेच पुजाराच्या या प्रतिक्रियेमुळे ऑस्ट्रेलियाचे धाबे दणाणले असतील इतकं मात्र निश्चित. तसेच पुजाराच्या या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवुड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.