AUS vs IND 1st Test : टीम इंडियाने टॉस जिंकला, दोघांचं डेब्यू, अश्विन-जडेजाला नो एन्ट्री
Australia vs India Playing Eleven 1st Test Toss Perth : भारताने नाणेफेक जिंकली आहे. जाणून घ्या टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळाली?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-2025 मधील पहिला सामना हा पर्थ येथे खेळवण्या येत आहे. रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची धुरा आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 20 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा निकाल लागला. कॅप्टन बुमराह याने बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून दोघांना पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. तर फक्त एक सामना खेळेलेल्या खेळाडूचाही समावेश करण्यात आला आहे.
दोघांचं पदार्पण
ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी आणि हर्षीत राणा या दोघांचं पदार्पण झालं आहे. या दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. त्याच्या जोरावर या दोघांची भारतीय संघात निवड करण्यात आली आणि पदार्पणाची संधी मिळाली. तसेच इंग्लंड विरुद्ध मायदेशात पदार्पण करण्याऱ्या आणि फक्त 1 कसोटी सामन्याचा अनुभव असलेल्या देवदत्त पडीक्कल यालाही संधी देण्यात आली आहे. तर शुबमन गिल याला बोटाच्या दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागलं आहे.
आर अश्विन-रवींद्र जडेजाला नो एन्ट्री
पर्थ कसोटीतील प्लेइंग ईलेव्हनमध्ये टीम इंडियाचे अनुभवी ऑलराउंडर आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. रवींद्र जडेजाचा समावेश करण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र टीम मॅनजमेंटने वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
टीम इंडिया टॉसचा बॉस
Toss news from Perth!
India elect to bat in the first #AUSvIND Test 🏏
Follow live 📝 https://t.co/vGjR1dZqlt#WTC25 pic.twitter.com/BtFqi1PMIm
— ICC (@ICC) November 22, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवुड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.