IND vs AUS : सर्फराज-अश्विन आऊट, हा खेळाडू ओपनर, पर्थ टेस्टसाठी रवी शास्त्री यांची प्लेइंग ईलेव्हन
Australia vs India 1st Test Match : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे 22 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेतील सलामीचा सामना खेळवण्या येणार आहे.
टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी जोरदार सराव करत आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना हा 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे. कर्णधार रोहित शर्मा या सलामीच्या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत अजून नक्की नाही. अशात आता टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी त्यांची प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. शास्त्री यांनी रोहित पहिल्या सामन्यात खेळणार नाही या विचाराने 11 खेळाडूंची निवड केली आहे. त्यानुसार, टीममध्ये 3 वेगवान गोलंदाज, 1 पेस आणि 1 स्पिनर ऑलराउंडरचा समावेश केला आहे. त्यामुळे टीम इंडियाला आठव्या स्थानापर्यंत बॅटिंग असणार आहे. तर शास्त्री यांनी सर्फराज खान आणि आर अश्विन या दोघांची निवड केली नाही.
ओपनर कोण?
शास्त्री यांनी यशस्वी जयस्वाल याच्यासह ओपनिंगसाठी केएल राहुल नाही, तर शुबमन गिल याची निवड केली आहे. त्यामुळे केएल तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी येईल. शुबमनने याआधी ऑस्ट्रेलियात ओपनिंग केली आहे, असं शास्त्रींनी म्हटलं. शास्त्रींनुसार, निवडकर्त्यांकडे पर्याय असल्याने ओपनिंगला कुणाला पाठवायचं हा निर्णय आव्हानात्मक असेल. तुम्ही शुबमनला ओपनिंगला पाठवू शकता. त्याने ऑस्ट्रेलियात आधी ओपनिंग केली आहे, असंही शास्त्री यांनी नमूद केलंय.
सर्फराजऐवजी ध्रुव जुरेलची निवड
शास्त्री यांनी त्यांच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये सर्फराज खानऐवजी ध्रुव जुरेल याला पसंती दिली आहे. ध्रुवने ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात इंडिया एसाठी दोन्ही डावात अर्धशतकं ठोकलं होतं. शास्त्रींना स्पिनर म्हणून वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या दोघापैंकी कुणी एकच हवाय. तसेच शास्त्रींच्या या प्लेइंग ईलेव्हनमध्ये नितीश कुमार रेड्डी याचाही समावेश करण्यात आला आहे. नितीशही इंडिया ए साठी खेळलाय. तसेच जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज याचाही समावेश करण्यात आला आहे.
शास्त्रींची प्लेइंग ईलेव्हन
Big calls made by Ravi Shastri as he selects his India XI for the first #AUSvIND Test in Perth 👀#WTC25
More ➡ https://t.co/JEcBkbEJN3 pic.twitter.com/KvHYdZZZJX
— ICC (@ICC) November 15, 2024
रवी शास्त्री यांची पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल, यशस्वी जायसवाल, केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा/वाशिंगटन सुंदर, नितीश रेड्डी, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.