AUS vs IND : W,W,W, जसप्रीत बुमराहकडून कांगारुंना 3 झटके, टीम इंडियाचा पलटवार, पाहा व्हीडिओ
Jasprit Bumrah AUS vs IND Perth Test : टीम इंडियाचा पहिला डाव 150 धावांवर आटोपल्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराह याने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला 3 झटके दिले. बुमराहने तिघांपैकी एकाला भोपळा फोडू दिला नाही.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पर्थमधील पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवशी टीम इंडियाचे फलंदाज अपयशी ठरले. कर्णधार जसप्रीत बुमराह याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांना कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवता आला नाही. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. भारताचा डाव हा अवघ्या 150 धावांवर आटोपला. मात्र त्यानंतर टीम इंडियाने जोरदार पलटवार केला. तिसऱ्या सत्रात बॅटिंगसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाने झटपट 3 झटके देत बॅकफुटवर ढकललं.
बुमराहकडून कांगारुंना 3 झटके
एकट्या जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या तिघांना आऊट केलं. बुमराहने डेब्यूटंट नॅथन मॅकस्वीनी याला 10 धावांवर आऊट करत ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला. बुमराहने त्यानंतर सलग 2 चेंडूत 2 झटके देत ऑस्ट्रेलियाला पूर्णपणे बॅकफुटवर ढकललं. बुमराहने सातव्या ओव्हरमधील चौथ्या आणि पाचव्या बॉलवर अनुक्रमे उस्मान ख्वाजा आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांना आऊट केलं. उस्मान ख्वाजा 8 रन्सवर विराट कोहली याच्या हाती कॅच आऊट झाला. तर बुमराहने स्टीव्हन स्मिथला खातंही उघडून दिलं नाही. स्मिथला पहिल्याच बॉलवर एलबीडबल्यू केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची स्थिती 3 बाद 19 अशी झाली.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावातील 12 व्या ओव्हरमध्ये डेब्यूटंट हर्षित राणा याने ट्रेव्हिस हेड याची शिकार करत पहिलीवहिली विकेट मिळवली. राणाने हेडचा ऑफ स्टंप उडवत क्लिन बोल्ड केला.
बुमराहचा कांगारुंना दणका
“𝙇𝙚𝙡𝙚 𝙡𝙚𝙡𝙚” they said & @Jaspritbumrah93 gets the debutant Nathan McSweeney! 😁
What a delivery to get the breakthrough! ⚡
📺 #AUSvINDOnStar 👉 1st Test, Day 1, LIVE NOW! #AUSvIND #ToughestRivalry pic.twitter.com/axdidpP8GS
— Star Sports (@StarSportsIndia) November 22, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवुड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.