AUS vs IND : नितीश रेड्डीची निर्णायक खेळी, टीम इंडिया 180 धावांवर ऑलआऊट, मिचेल स्टार्कचा ‘सिक्स’
Australia vs India 2nd Test : टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशा केली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. मात्र अखेरीस नितीश रेड्डी याने फटकेबाजी करत टीम इंडियाला 180 धावांपर्यंत पोहचवलं.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील अॅडलेडमध्ये खेळवण्यात येत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशा केली आहे. टीम इंडियाला सामन्यातील पहिल्या दिवशी पहिल्या डावात 200 पारही पोहचता आलं नाही. काही फलंदाजांचा अपवाद वगळता इतर सर्व अपयशी ठरले. मात्र नितीश रेड्डी याने अखेरच्या क्षणी केलेल्या खेळीमुळे भारताला 150 मार मजल मारता आली. मिचेल स्टार्क याने आपल्या धारदार बॉलिंगच्या जोरावर 6 विकेट्स घेत भारताला 180 धावांवर गुंडाळलं. मिचेल स्टार्कने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. स्टार्कच्या कारकीर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. तर टीम इंडियासाठी नितीशने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. नितीशने 42 धावांची खेळी केली.
सामन्यातील पहिला डाव
कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल सलामी जोडी मैदानात आली. यशस्वी जयस्वाल आला तसाच मैदानाबाहेर गेला. स्टार्कने यशस्वीला सामन्यातील पहिल्या बॉलवर आऊट केलं. त्यानंतर केएल राहुल आणि शुबमन गिल या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. मात्र ही जोडी फुटली आणि टीम इंडियाची घसरगुंडी झाली.
केएल राहुल 37 धावा करुन बाद झाला. स्टार्कने ही सेट जोडी फोडली. शुबमन गिलला चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. तर विराट आणि रोहितने निराशा केली. विराट कोहली 7, शुबमन गिल 31, कॅप्टन रोहित शर्मा 3 धावा करुन माघारी परतले. पंत आक्रमकपणे खेळत होता. मात्र ऑस्ट्रेलिया कॅप्टन पॅट कमिन्स याने पंतला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. पंत 21 धावांवर बाद झाला. आर अश्विनबाबतही तसंच झालं. अश्विन चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करु शकला नाही. अश्विन 22 धावांवर आऊट झाला. हर्षित राणा याला भोपळाही फोडता आला नाही.
नितीश रेड्डीची निर्णायक खेळी
Nitish Kumar Reddy top-scores with 42 as #TeamIndia post 180 in the 1st innings.
Final Session of the day coming up.
Live ▶️ https://t.co/upjirQCmiV#AUSvIND pic.twitter.com/HEz8YiRHc0
— BCCI (@BCCI) December 6, 2024
एकाबाजूला विकेट जात असताना नितीश रेड्डी संधी मिळेल तशी फटकेबाजी करत होता. नितीशने बुमरासह मोठे फटके मारले. बुमराह काही वेळ मैदानात राहिल्यानंतर 8 चेंडू खेळून आऊट झाला. त्यानंतर मोहम्मद सिराज आला. सिराजने चौकार ठोकला. भारताने यासह 180 धावा पूर्ण केल्या. स्टार्कने नितीश रेड्डीला ट्रॅव्हिस हेड याच्या हाती कॅच आऊट केलं. नितीशने 54 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह सर्वाधिक 42 धावा केल्या. तर मिचेल स्टार्कने 14.1 ओव्हरमध्ये 48 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स घेतल्या. स्टार्कची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसेच पॅट कमिन्स आणि स्कॉट बॉलँड या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.