AUS vs IND : मिचेल स्टार्कने वचपा काढला, यशस्वी जयस्वाल गोल्डन डक, टीम इंडियाला पहिल्याच बॉलवर झटका

Yashasvi Jaiswal Golden Duck : टीम इंडियाचा युवा ओपनर बॅट्समन यशस्वी जयस्वाल याला मिचेल स्टार्कने या मालिकेत दुसऱ्यांदा झिरोवर आऊट केलं आहे. पाहा व्हीडिओ.

AUS vs IND : मिचेल स्टार्कने वचपा काढला, यशस्वी जयस्वाल गोल्डन डक, टीम इंडियाला पहिल्याच बॉलवर झटका
Yashasvi Jaiswal and Mitchell Starc
Follow us
| Updated on: Dec 06, 2024 | 10:28 AM

टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अ‍ॅडलेड ओव्हलमध्ये अत्यंत निराशाजनक सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल हा त्याच्या आणि टीम इंडियाच्या डावातील पहिल्याच बॉलवर आऊट झाला आहे. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने यशस्वीला आऊट करत ऑस्ट्रेलियाला अप्रतिम सुरुवात करुन दिली. मिचेलने अशाप्रकारे बदला घेतला. यशस्वीची अशाप्रकारे या मालिकेतील तिसऱ्या डावातील झिरोवर आऊट होण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. यशस्वी आऊट झाल्यानंतर शुबमन गिल मैदानात आला आहे.

कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय केला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल ही सलामी जोडी मैदानात आली. यशस्वी स्ट्राईकवर गेला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क पहिली ओव्हल टाकायला तयार झाला. स्टार्कने डावखुऱ्या यशस्वीला लेग स्टंपवर बॉल टाकला. यशस्वी इथे स्टंपसमोर आढळला. स्टार्कने एलबीडब्ल्यूसाठी अपील केली. अंपायरने क्षणाचा विलंब न करता हात उचलत यशस्वी आऊट असल्याचं जाहीर केलं. मिचेलने अशाप्रकारे यशस्वीला आऊट करत वचपा काढला. यशस्वीने पहिल्या सामन्यात स्टार्कला बॉलिंगदरम्यान “इट् कमिंग टु स्लो” असं म्हणत डिवचलं होतं. मात्र आता मिचेलने यशस्वीला आऊट केल्याने त्याने वचपा काढल्याचं म्हटलं जात आहे.

यशस्वी पर्थमधील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावातही झिरोवर आऊट झाला होता.यशस्वीने 7 चेंडू निट खेळले. मात्र आठव्या बॉलवर मिचेल स्टार्कने त्याला आऊट केलं. मिचेलने यशस्वीला पर्थमध्ये नॅथन मॅकस्वीनी याच्या हाती कॅच आऊट केलं होतं.

यशस्वी जयस्वाल गोल्डन डक, भारताला पहिल्याच बॉलवर झटका

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.