AUS vs IND : बुम बुम.., W,W,W, जसप्रीतचा ॲडलेडमध्ये धमाका, झहीर खानचा रेकॉर्ड ब्रेक
Jasprit Bumrah Break Zaheer Khan Record : जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसर्या कसोटीत पहिले 3 विकेट्स घेत झहीर खानचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि उपकर्णधार जसप्रीत बुमराह याने ऑस्ट्रेलियात विक्रम करण्याचा सपाटा सुरुच ठेवला आहे. बुमराहने रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवून दिला. बुमराह यासह ऑस्ट्रेलियात अजिंक्य रहाणे नंतर पहिल्याच सामन्यात विजय मिळवून देणारा पहिला कर्णधार ठरला. त्यानंतर बुमराहने दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी 6 डिसेंबरला उस्मान ख्वाजा याला आऊट करत ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला. बुमराह यासह टीम इंडियासाठी एका वर्षात 50 विकेट्स घेणारा कपिल देव आणि झहीर खान यांच्यानंतर तिसरा गोलंदाज ठरला. त्यानंतर आता बुमराहने आणखी एक कारनामा केला आहे.
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाला दुसर्या दिवशी 2 झटके दिले. बुमराहने नॅथन मॅकस्वीनी आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांना बाद केलं. बुमराहने स्मिथला आऊट करताच इतिहास घडवला. बुमराह यासह टीम इंडियासाठी एका वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. बुमराहने श्रीरामपूर एक्सप्रेस झहीर खान याचा 50 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड उद्धवस्त केला. झहीरने 2002 साली 50 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र आता बुमराहरने झहीरला मागे टाकलं आहे.
सामन्यात आतापर्यंत काय झालं?
दरम्यान टीम इंडियाचा पहिला डाव हा 180 धावांवर आटोपला. त्यानंतर पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 1 विकेट गमावून 86 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया 94 धावांनी पिछाडीवर होती. बुमराहने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या दिवशी 91 धावांवर दुसरा तर 103 वर तिसरा झटका दिला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने मार्नस लबुशेन याच्या रुपात चौथी विकेट गमावली. लबुशेन 64 धावा करुन माघारी परतला. तर त्यानंतर पहिल्या सत्राचा खेळ संपला तेव्हा ट्रेव्हिस हेड 53 आणि मिचेल मार्श 2 धावांवर नाबाद परतले आहेत. ऑस्ट्रेलियाने 59 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 191 धावा केल्या आहेत. यजमानांकडे 11 धावांची आघाडी आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.