AUS vs IND : टीम इंडियात दुसऱ्या सामन्यासाठी 2 बदल फिक्स, रोहितसाठी कुणाचा पत्ता होणार कट?
Pink Ball Test : बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना हा 6 डिसेंबरपासून अॅडलेड ओव्हल येथे होणार आहे. टीम इंडियात या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल होणार असल्याचं निश्चित आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील कसोटी मालिकेतील दुसरा सामना हा अॅडलेड ओव्हल येथे 6 ते 10 डिसेंबर दरम्यान होणार आहे. हा सामना दिवस-रात्र चालणार असून गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. हा सामना 2 कारणांमुळे अधिक चर्चेत आहे. एक तर हा सामना गुलाबी चेंडूने होणार आहे. तर दुसरं कारण म्हणजे नियमित कर्णधार रोहित शर्मा याचं पुनरागमन झालं आहे. त्यामुळे टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल निश्चित मानले जात आहेत.
रोहित शर्मा पहिल्या कसोटीसाठी कौटुंबिक कारणामुळे उपस्थित नव्हता. मात्र आता तो परतलाय. रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह याने टीम इंडियाचं नेतृत्व केलं. बुमराहने भारताला पर्थ कसोटीतील चौथ्याच दिवशी आपल्या नेतृत्वात विजयी केलं. भारताने ऑस्ट्रेलियावर धावांबाबतीत सर्वात मोठा विजय मिळवला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. आता रोहित शर्मा परतल्याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार, हे निश्चित आहे. रोहितच्या गैरहजेरीत केएल राहुल याने यशस्वी जयस्वालसह ओपनिंग केली होती. आता रोहित दुसऱ्या सामन्यात सलामीला येणार की केएलसाठी आपल्या जागेचा त्याग करणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
शुबमन गिलचं कमबॅक
शुबमन गिल याला दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकावं लागलं होतं. मात्र शुबमनने ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर इलेव्हन विरूद्धच्या सराव सामन्यात अर्धशतकी खेळी केली. शुबमन यासह कमबॅक करणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळे रोहित आणि शुबमनच्या कमबॅकमुळे आता कुणा दोघांचा पत्ता कट होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
या दोघांचा पत्ता कट!
शुबमन गिल याच्या अनुपस्थितीत देवदत्त पडीक्कल याने तिसऱ्या स्थानी बॅटिंग केली होती. त्यामुळे शुबमन गिलच्या कमबॅकनंतर देवदत्तला डच्चू मिळणार हे निश्चित आहे. तर रोहितसाठी ध्रुव जुरेल याला बाहेर बसावं लागणार आहे.
भारत की संभावित प्लेइंग इलेवन: केएल राहुल, यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा (कप्तान), ऋषभ पंत (विकेटकीपर), नीतीश रेड्डी, वाशिंगटन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह और मोहम्मद सिराज