AUS vs IND : दुसऱ्या कसोटीतून गोलंदाज बाहेर, दोघांची एन्ट्री, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी?

Australia vs India 2nd Pink Ball Test Day Night Match : पहिल्या कसोटीत 5 विकेट्स घेणारा गोलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी 2 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

AUS vs IND : दुसऱ्या कसोटीतून गोलंदाज बाहेर, दोघांची एन्ट्री, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी?
india vs australia bgtImage Credit source: Icc X Account
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 12:44 PM

बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-2025 या प्रतिष्ठेच्या कसोटी मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया आधीच बॅकफुटवर आहे. टीम इंडियाने जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत चौथ्या दिवशी विजय मिळवला.टीम इंडियाने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर दुसरा कसोटी सामना हा 10 नोव्हेंबरपासून एडलेड येथे होणार आहे. हा सामना डे नाईट असून गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी ऑस्ट्रेलियाची टेन्शन आणखी वाढलं आहे. मिचेल मार्श खेळणार की नाही याबाबत शंका असतानाच ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज जोश हेझलवूड हा दुसऱ्या कसोटीतून दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्यामुळे हेझलवूडच्या जागी दोघांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र तिसऱ्याच खेळाडूला जोश हेझलवूड याच्या जागी दुसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता आहे.

जोश हेझलवूड याच्या जागी सीन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेट या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या दोन्ही अनकॅप्ड खेळाडूंना कव्हर म्हणून संधी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूवा जोश हेझलवूड याच्या जागी दुसऱ्या सामन्यासाठी स्कॉट बोलँड याचा समावेश केला जाऊ शकतो. स्कॉटने 10 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र स्कॉट जवळपास 18 महिन्यांपासून ऑस्ट्रेलियासाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही. स्कॉटने अखेरचा कसोटी सामना 6 जुलै 2023 रोजी इंग्लंड विरुद्ध हेडिंग्ले येथे खेळला होता.

हेझलवूडच्या जागी दोघांचा समावेश

ऑस्ट्रेलियासमोर आव्हान

दरम्यान मालिकेत 0-1 ने पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियासमोर दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेवर घट्ट पकड मिळवण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर, सीन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेट.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.