AUS vs IND : स्टीव्हन स्मिथचं ऐतिहासिक शतक, रिकी पॉन्टिंग-स्टीव्ह वॉ याचा रेकॉर्ड उद्धवस्त
Steven Smith Century : स्टीव्हन स्मिथ याने 15 महिन्यांची प्रतिक्षा संपवत टीम इंडियाविरुद्ध विक्रमी आणि ऐतिहासिक शतक झळकावलं आहे. स्मिथने या शतकी खेळीसह 2 माजी कर्णधारांचे विक्रम उद्धवस्त केले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ याला अखेर सूर गवसला आहे. स्टीव्हन स्मिथ याने ट्रेव्हिस हेड याच्यानंतर टीम इंडिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात द गाबा ब्रिस्बेन येथे विक्रमी आणि ऐतिहासिक शतक ठोकलं आहे. स्मिथने तब्बल 536 दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकलं. स्टीव्हनच्या कसोटी कारकीर्दीतील हे 33 वं शतक ठरलं. स्टीव्हन स्मिथ याने या शतकासह ऑस्ट्रेलियाच्या 2 माजी कर्णधारांचा विक्रम उद्धवस्त केला आहे. स्टीव्हनने यासह रिकी पॉन्टिंग आणि स्टीव्ह वॉ या दोघांना मागे टाकलं आहे.
स्टीव्हने 82 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर शतक पूर्ण केलं. स्टीव्हनने 185 बॉलमध्ये 54.5 या स्ट्राईक रेटने 12 चौकारांच्या मदतीने हे शतक झळकावलं. स्टीव्हनने या शतकासह मार्क वॉ याचा 32 कसोटी शतकांचा रेकॉर्ड ब्रेक केला. स्टीव्हन यासह ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक कसोटी शतकं करणारा रिकी पॉन्टिंगनंतर एकूण दुसरा तर पहिला सक्रीय फलंदाज ठरला आहे. तसेच स्टीव्हन टीम इंडियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (टेस्ट+वनडे+टी 20I) सर्वाधिक शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला. स्टीव्हनचं भारताविरूद्धचं हे 15 वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. स्टीव्हनने यासह रिकी पॉन्टिंगला मागे टाकलं.
ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक कसोटी शतकं
- रिकी पॉन्टिंग : 41
- स्टीव्हन स्मिथ :33
- स्टीव्ह वॉ : 32
- मॅथ्यू हेडन : 30
- डॉन ब्रॅडमॅन : 29
15 महिन्यांनंतर शतक
दरम्यान स्टीव्हनने या शतकासह 15 महिन्यांची प्रतिक्षा संपवली. स्टीव्हनने याआधी 29 जून 2023 रोजी अॅशेस सीरिजमधील दुसऱ्या सामन्यात लॉर्ड्स स्टेडियममध्ये अखेरचं शतक केलं होतं.
भारताविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं
- स्टीव्हन स्मिथ : 15
- रिकी पॉन्टिंग : 14
- जो रुट : 13
- कुमार संगकारा : 11
- व्हीव्हीयन रिचर्ड्स : 11
स्टीव्हन स्मिथचं ऐतिहासिक शतक
For the first time in 25 innings, since the 2023 Ashes at Lord’s, Steve Smith has a Test match century!
It’s the 33rd of his career, moving him into outright second for Australia 👏#AUSvIND pic.twitter.com/4kt6rcDsYJ
— 7Cricket (@7Cricket) December 15, 2024
तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेजलवुड.
तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नीतीश कुमार रेड्डी.