AUS vs IND : कसोटी कारकीर्दीतील नववं, भारताविरुद्धचं सलग दुसरं तर एकूण तिसरं, ट्रेव्हिस हेडचा शतकी तडाखा सुरुच

Travis Head Century : ट्रेव्हिस हेड याने टीम इंडियाच्या गोलंदाजांना झोडत सलग दुसरं कसोटी शतक झळकावलं आहे. हेडच्या कसोटी कारकीर्दीतील हे एकूण नववं शतक ठरलं आहे.

AUS vs IND : कसोटी कारकीर्दीतील नववं, भारताविरुद्धचं सलग दुसरं तर एकूण तिसरं, ट्रेव्हिस हेडचा शतकी तडाखा सुरुच
travis head century aus vs ind 3rd test
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 12:11 PM

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड याने टीम इंडियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसर्‍या दिवशी शतक ठोकलं आहे. हेडने या शतकी खेळीसह टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे. ऑस्ट्रेलियाने या शतकासह दुसऱ्या सत्रापर्यंत घट्ट पकड मिळवली आहे. हेडचं हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील एकूण नववं शतक ठरलं आहे. विशेष म्हणजे हेडचं हे टीम इंडियाविरुद्धचं सलग दुसरं आणि एकूण तिसरं शतक ठरलंय. हेडने याआधी ॲडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही शतक झळकावलं होतं. हेडच्या या सुस्साट खेळीमुळे टीम इंडियाची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे.

ट्रेव्हिस हेड याने सामन्यातील 69 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर 2 धावा घेत शतक पूर्ण केलं. हेडने 115 बॉलमध्ये 13 चौकारांच्या मदतीने 87.83 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. हेड याआधी द गाबा, ब्रिस्बेनमधील गेल्या 3 डावात गोल्डन डक ठरला होता.सोप्या शब्दात सांगायचं तर हेड याच मैदानात गेल्या तिन्ही डावात पहिल्या बॉलवर आऊट झाला होता. मात्र हेडला टीम इंडियाविरुद्ध कायमच सूर गवसतो, हे त्याने पुन्हा एकदा या शतकी खेळीतून दाखवून दिलंय.

हे सुद्धा वाचा

सलग दुसरं शतक

दरम्यान हेडने याआधी याच मालिकेत दुसर्‍या सामन्यात ॲडलेडमध्ये 111 बॉलमध्ये 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 90.09 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं होतं. हेडने त्या सामन्यात 141 चेंडूत 140 धावा केल्या होत्या. हेडला त्या सामन्यात मोहम्मद सिराज याने क्लिन बोल्ड केलं होतं.

हेडचा शतकी झंझावात

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेजलवुड.

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नीतीश कुमार रेड्डी.

आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?.
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही.
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?.
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?.
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला.
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं.
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?.
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....