Australia vs India 3rd test | टीम इंडियाच्या खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका, हरभजनचे ट्विट, म्हणाला…

मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर तिसऱ्या सामन्यातील तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी वर्णभेदी टीका करण्यात आली.

Australia vs India 3rd test | टीम इंडियाच्या खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका, हरभजनचे ट्विट, म्हणाला...
हरभजन सिंग
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 2:46 PM

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (India vs Australia 3rd test) यांच्यात सिडनीत (Sydney) तिसरी कसोटी खेळण्यात येत आहे. या सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडून टीम इंडियाच्या खेळाडूंवर वर्णभेदी टीका तसेच शिवीगाळ करण्यात आली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (9 जानेवारी) जसप्रीत (Jasprit Bumrah) बुमराह आणि मोहम्मद सिराजला (Mohmmad Siraj) या वर्णभेदी टीकेचा (Racial Abuse) आणि शिव्यांचा सामना करावा लागला. सामना पाहायाला आलेल्या एका मद्यधुंद प्रेक्षकाने ही शिवागाळ केली. यानंतर सामन्याच्या चौथ्या दिवशीही सिराजवर टीका करण्यात आली. हा सर्व प्रकार पाहून कर्णधार अजिंक्य रहाणेने याबाबत पंचांकडे तक्रार केली. यानंतर काही वेळ खेळ थांबवण्यात आला. सर्व प्रकारानंतर पोलिसांनी टीका करणाऱ्या प्रेक्षकांची हकालपट्टी केली. क्रिकेट प्रेमींकडून यासर्व प्रकाराबाबत टीका केली जात आहे. दरम्यान टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंहने याबाबत ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून आपली मत व्यक्त केलं आहे. (aus vs ind 3rd test match harbhajan singh criticise to australia crowd on Racial Abuse)

हरभजन काय म्हणाला?

मोहम्मद सिराजवर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वर्णभेदी टीका करण्यात आली. बीसीसीआयच्या सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिराजला प्रेक्षकाने माकड (Monkey) म्हटलं. या निमित्ताने 2008 मधील मंकीगेट प्रकरणाला उजाळा मिळाला आहे. विशेष म्हणजे या सिडनीतच मंकीटगेट प्रकरण घडलं होतं. ऑस्ट्रेलियाचा अँड्रयू सायमंड आणि हरभजन सिंह यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. हरभजनने यावरुन ट्विट केलं.

“मला ऑस्ट्रेलियात खेळताना अनेकदा वाईट अनुभव आले आहेत. ऑस्ट्रेलियात फिल्डिंग करताना माझ्या कानावर अनेकदा वाईट गोष्टी पडल्या आहेत. माझ्यावर अनेकदा धार्मिक तसेच वर्णद्वेषी टीका करण्यात आली. मला ऑस्ट्रेलियातील प्रेक्षकांचा वाईट अनुभव आहे. मोहम्मद सिराजलाही अशाच टीकेचा सामना करावा लागला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांकडून टीका करण्याची ही काय पहिली वेळ नाही. या सर्व प्रकाराला आळा कसा घालणार, असा प्रश्न उपस्थित करच हरभजनने आपला संताप व्यक्त केला”

हरभजनने केलेलं ट्विट

काय आहे मंकीगेट प्रकरण?

यासर्व प्रकरणामुळे 2008 मधील मंकीगेट प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. यावेळेस ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सामना खेळला जात होता. ऑस्ट्रेलियाकडून अँड्रयू सायमंड फलंदाजी तर हरभजन सिंह गोलंदाजी करत होता. गोलंदाजीदरम्यान ने हरभजनने माझा 4-5 वेळा (Monkey) माकड असा उल्लेख केला, असा आरोप सायमंडने केला होता. यामुळे एकच वाद निर्माण झाला होता. यामुळे हरभजनवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून माफीनामा

या वर्णद्वेषी टीकेमुळे बुमराह आणि सिराजला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऑस्ट्रेलियातील प्रेक्षकांकडून टीम इंडियाच्या खेळाडू्ंना ही टीका सहन करावी लागली. यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाच्या खेळाडूंची माफी मागितली आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. तसेच सर्व आरोपींची स्डेटियमधील सुरक्षा अधिकारी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (CA) अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. तसेच दोन दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे. यामुळे या प्रकाराबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी भारतीय खेळाडूंची माफी मागितली आहे.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 3rd Test | सिडनीत रडीचा डाव, दारु पिऊन बुमराह, सिराजला शिव्या, भारताकडून तक्रार

Sydney Test : भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा माफीनामा

(aus vs ind 3rd test match harbhajan singh criticise to australia crowd on Racial Abuse)

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.