Aus vs Ind 3rd Test | ‘दस का दम’, डेव्हिड वॉर्नरला बाद करत अश्विनची विक्रमी कामगिरी
अशी कामगिरी करणारा अश्विन हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 3rd Test) यांच्यात सिडनीत तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसावर कांगारुंचं वर्चस्व राहिलं. कांगारुंनी दिवसखेर एकूण 2 विकेट्स गमावून 103 धावा केल्या. कांगारुंनी विल पुकोव्हसकी आणि डेव्हिड वॉर्नर या दोन सलामीवीरांचे विकेट्स गमावले. पुकोव्हस्कीला मोहम्मद सिराजने आऊट केलं. तर फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) डेव्हिड वॉर्नरला (David Warner) एलबीडबल्यू आऊट केलं. वॉर्नरला आऊट करत अश्विनने विक्रमी कामगिरी केली आहे. (aus vs ind 3rd test r ashwin gets david warner out for the 10th time in Test cricket)
काय आहे विक्रम?
अश्विनने वॉर्नरला कसोटी सामन्यात बाद करण्याची ही 10 वेळ ठरली आहे. अश्विन वॉर्नरला कसोटीमध्ये सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. तसेच अश्विनने आतापर्यंत वॉर्नरला तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून एकूण 12 वेळा आऊट केलं आहे. अश्विनने वॉर्नर व्यतिरिक्त इंग्लडंच्या एलिस्टर कुकला 9 तर बेन स्टोक्सला 7 वेळा आऊट केलं आहे.
Warner is 1st Batsmen to be dismissed by Ashwin 10 times in Tests
10 Warner9 Cook7 Cowan7 Stokes6 Bravo6 Elgar6 Morkel6 Powell6 Samuels6 Starc
Only Samuels the right hander in above List#AUSvsIND #AUSvIND #Ashwin #INDvsAUS#INDvAUS #PSL6 #CricketAustralia #Warner pic.twitter.com/jFvbk6UDmj
— Irshad (@syedirshaadali) January 9, 2021
Ravi Ashwin gets David Warner out for the 10th time in Test cricket.
10- D warner9- A cook8- E cowan/ B stokes#INDvsAUS pic.twitter.com/JaiMZMRYi6
— Sourabh Raut (@xzx_slipknot) January 9, 2021
अश्विन चौथ्या क्रमांकावर
अश्विनने गेल्या दशकभरात (2011-2020) आपल्या फिरकीने अनेक फलंदाजांना गुंडाळलं आहे. अश्विन दशकभरात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. अश्विनने (2011-2020) या वर्षांमध्ये कसोटी सामन्यात एकूण 375 विकेट्स घेतल्या आहेत.
Top Test Wicket-TakersDecade: 2011-2020
? 415 Stuart Broad? 395 James Anderson? 394 Nathan Lyon? 375 Ravi Ashwin? 355 Rangana Herath? 276 Trent Boult? 271 Tim Southee? 252 Mitchell Starc? 227 Yasir Shah? 224 Vernon Philander#Cricket ? pic.twitter.com/p1mVHhUC4X
— The Sports Wire (@_TheSportsWire) January 9, 2021
सामन्याचा धावता आढावा
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी तिसऱ्या दिवसाच्या सुरुवात चांगली केली. गोलंदाजांनी टीम इंडियाचा पहिला डाव 244 धावांवर गुंडाळला. यामुळे ऑस्ट्रेलियाला 94 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली.
यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया फलंदाजासाठी आली. ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात राहिली नाही. ऑस्ट्रेलियाने पहिले 2 विकेट्स लवकर गमावल्या. यामुळे 35-2 अशी स्थिती झाली. पण यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात तिसऱ्या दिवसखेर नाबाद 68 धावांची भागीदारी झाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाची 2 बाद 103 अशी धावसंख्या होती. तसेच लाबुशेन 47 तर स्टीव्ह स्मिथ 29 धावांवर नॉट आऊट आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाकडे 197 धावांची आघाडी आहे. यामुळे चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर कांगारुंना रोखण्याचे आव्हान असणार आहे.
संबंधित बातम्या :
Aus vs Ind 3rd Test | टीम इंडियासाठी वाईट बातमी, रिषभ पंत दुखापतग्रस्त
Australia vs India, 3rd Test | पंत पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूला दुखापत
Ravichandran Ashwin | अश्विनच्या फिरकीवर भल्याभल्यांची गिरकी, मुरलीधरनचा विक्रम मोडला
(aus vs ind 3rd test r ashwin gets david warner out for the 10th time in Test cricket)