AUS vs IND 3rd Test | पंतचं ढिसाळ क्षेत्ररक्षण, पुकोव्हस्कीला 2 जीवनदान, सोशल मीडियावर ट्रोल
विकेटकीपर रिषभ पंतने पुकोव्हस्कीला 2 जीवनदान दिले. पुकोव्हस्कीने याचा फायदा घेत अर्धशतकी खेळी केली.
सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया (AUS vs IND 3rd Test) यांच्यात सिडनीत (SCG) तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाचा विकेटकीपर असलेला रिषभ पंत (Rishabh Pant) पुन्हा एकदा ट्रोल झाला आहे. नेटीझन्सने पंतला पुन्हा एकदा निशाण्यावर धरलं आहे. पंतने कीपींग करताना ढिसाळ क्षेत्ररक्षण केलं. यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोव्हस्कीला (Will Pucovski) तब्बल 2 जीवनदान दिले. म्हणजेच पुकोव्हस्कीच्या दोनदा कॅच सोडल्या. यामुळे पंत चांगलाच ट्रोल होत आहे. #Pant ट्विटरवर ट्रेंड होत आहे. (aus vs ind 3rd test Wicket keeper Rishabh Pant dropped two catches Will Pucovski)
नक्की काय घडलं?
फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन सामन्यातील 22 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर पुकोव्हस्कीने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पुकोव्हस्कीचा हा प्रयत्न फसला. पुकोव्हस्कीच्या बॅटला कट लागून चेंडू कीपर पंतच्या दिशेने गेला. मात्र पंतने हा कॅच सोडला. यामुळे पुकोव्हस्कीला पहिलं जीवनदान मिळालं. यामुळे अश्विन पंतवर संतापलेला पाहायला मिळाला.
पुकोव्हस्कीला मिळालेला पहिला जीवनदान
Pant gives Puc a life! #AUSvIND pic.twitter.com/PwhpHuJI4D
— cricket.com.au (@cricketcomau) January 7, 2021
यानंतर पुकोव्हस्कीला मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर दुसरं जीवनदान मिळालं. सामन्यातील 25 वी ओव्हर. मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. सिराजने टाकलेल्या चेंडूवर पुकोव्हस्कीने हुक शॉर्ट मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागला. यामुळे चेंडू पंतच्या मागच्या दिशेने गेला. पंतने उलट धावत जात कॅच घेण्याचा प्रयत्न केला. हवेत झेप घेतली. मात्र अखेरीस कॅच सुटलाच.
पंतने सोडलेला कॅच
A rollercoaster of emotions for Will Pucovski! Initially given out, but on closer inspection he's recalled to the crease! #OhWhatAFeeling@Toyota_Aus | #AUSvIND pic.twitter.com/WgT5lCRjAE
— cricket.com.au (@cricketcomau) January 7, 2021
पुकोव्हस्कीला दुसरं जीवनदान 32 धावांवर मिळालं. पुकोव्हस्कीने या जीवनदानाचा चांगलाच फायदा घेतला. पुकोव्हस्कीने पदार्पणातील सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी केली. यासह त्याने ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणून ठेवलं. मात्र त्याला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपातंर करता आले नाही. नवदीप सैनीने पुकोव्हस्कीला 62 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं.
पंत ट्रोल
या 2 कॅच सोडल्याने पंतला चांगलंच ट्रोल करण्यात आले आहे. पुकोव्हस्की 62 धावांवर बाद झाला. पण पंतने पुकोव्हस्कीचा कॅच घेतला असता, तर पुकोव्हस्कीच्या खेळीला नक्कीच ब्रेक लागला असता. पंतच्या या ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे चाहत्यांकडून निराशा व्यक्त केली जात आहे.
व्हायरल मीम्स
Rishabh pant dropped a simple catch , Meanwhile Saha: pic.twitter.com/33NcCXXvHX
— Gaurav Gupta (@g48660305) January 7, 2021
Rishabh pant dropped two catches already, Meanwhile Saha: pic.twitter.com/CAcYoG1BI2
— Corona Warrior (@corona_warrior) January 7, 2021
Scenes when pant says c'mon ash next time. pic.twitter.com/TWlYfgNMXP
— Heisenberg☢ (@internetumpire) January 7, 2021
संबंधित बातम्या :
Sourav Ganguly | सहा दिवसांच्या उपचारानंतर ‘दादा’ ठणठणीत, सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज
AUS vs IND 3rd Test | तिसऱ्या कसोटीत डेव्हिड वॉर्नर अपयशी, नकोशा विक्रमाची नोंद
(aus vs ind 3rd test Wicket keeper Rishabh Pant dropped two catches Will Pucovski)