Brisbane Test | “नियमांनुसार खेळायचं असेल तरच या”, ब्रिस्बेनमध्ये चौथी कसोटीस नकार देणाऱ्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाच्या मंत्र्याचा इशारा

ब्रिस्बेनमध्ये क्वारंटाईनचे नियम कडक आहेत. यामुळे टीम इंडियाने ब्रिस्बेनमध्ये चौथी कसोटी न खेळण्याची भूमिका घेतल्याचे वृत्त आहे.

Brisbane Test | नियमांनुसार खेळायचं असेल तरच या, ब्रिस्बेनमध्ये चौथी कसोटीस नकार देणाऱ्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाच्या मंत्र्याचा इशारा
ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीला बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे.
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 4:28 PM

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया  (India vs Australia Test Series)  यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळण्यात येत आहे. या मालिकेत टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. यामुळे मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. या मालिकेतील तिसरा सामना सिडनीत 7 जानेवारीपासून खेळण्यात येणार आहे. तर चौथा आणि शेवटचा सामना 15 जानेवारीला खेळला जाणार आहे. ब्रिस्बेनमध्ये (brisbane) कोरोनाबाबत कठोर नियम आहेत. या नियमांमुळे टीम इंडियाने तिथे सामना खेळण्यास नकार दिल्याचं वृत्त आहे. या भूमिकेवर ऑस्ट्रेलियाच्या मंत्र्याने धमकीच दिली आहे. (aus vs ind 4th brisbane test match australia minister Ros Bates said india dont come yet brisbane)

क्वीसलॅंडच्या शेडो आरोग्य मंत्री रोस बेट्स (Ros Bates) यांनी धमकीच दिली आहे. टीम इंडियाला येथे येण्याची काही गरज नाही, अशी प्रतिक्रिया रोस बेट्स यांनी दिली आहे. त्यांनी याबाबतीत एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामुळे टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात या प्रकरणावरुन वाद निर्माण होऊ शकतात.

टीम इंडियाची भूमिका काय?

कसोटी मालिकेतील तिसरा सामना हा 7 जानेवारीला सिडनीत खेळण्यात येणार आहे. यानंतर चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जाईल. ब्रिस्बेनमध्ये कोरोना संदर्भात अत्यंत कडक नियम आहेत. त्यामुळे ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाला क्वांरटाईन रहाव लागेल. त्यामुळे चौथा सामना ब्रिस्बेनमध्ये घेण्याऐवजी सिडनीतच खेळवण्यात यावा, अशी मागणी टीम इंडियाची आहे. अशी माहिती टीम इंडियाच्या सूत्रांनी दिली आहे.

“आयपीएलनिमित्त आधी आम्ही क्वारंटाईन राहिलो. त्यानंतर दुबईहून ऑस्ट्रेलियाला आलो. तेव्हाही नियमांनुसार आम्ही क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला. आम्ही स्थानिक सरकारला वेळोवेळी सहकार्य केलं. म्हणजेच आम्ही जवळपास महिनाभर क्वारंटाईन राहिलो. ऑस्ट्रेलियामध्ये क्वारंटाईन कालावधीनंतर आम्हाला सामान्य नागरिकांप्रमाणे फिरण्याची संधी मिळेल, असं वाटलं होतं. पण जर पुन्हा ब्रिस्बेनमध्ये चौथ्या सामन्यासाठी क्वारंटाईन रहावं लागणार असेल, तर चौथा सामनाही सिडनीतच घ्यावा”, अशी भूमिका टीम इंडियाची आहे.

दरम्यान याआधी टीम इंडियाच्या 5 खेळाडूंनी मेलबर्नमध्ये हॉटेलात जेवण केलं. त्या ठिकाणी एका चाहत्याने टीम इंडियाच्या या खेळाडूंसोबत फोटो काढले. तसेच या खेळाडूंच्या जेवणाचं बिलही त्यानेच दिलं. यानंतर त्या चाहत्याने बिलाचे आणि क्रिकेटपटूंसह काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंवर टीका करण्यात आली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून या 5 जणांना आयसोलेट करण्यात आलं. तसेच या खेळाडूंनी कोरोना नियमांचं उल्लंघन केलं का, याबाबत चौकशी केली जात आहे.

संबंधित बातम्या :

AUS vs IND | चौथ्या कसोटीवर धोक्याचं सावट, ब्रिस्बेनमध्ये खेळण्यास टीम इंडियाचा नकार?

(aus vs ind 4th brisbane test match australia minister Ros Bates said india dont come yet brisbane)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.