Ajinkya Rahane | ना कोहली, ना बुमराह, नवख्या खेळाडूंना घेऊन अजिंक्य रहाणे कसा जिंकला?

अजिंक्यने आपल्या नेतृत्वात अनुभवी खेळाडंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला बॉर्डर गावसकर मालिकेत विजय मिळवून दिला.

Ajinkya Rahane |  ना कोहली, ना बुमराह, नवख्या खेळाडूंना घेऊन अजिंक्य रहाणे कसा जिंकला?
टीम इंडियाची 'अंजिक्य' कामगिरी
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 3:12 PM

ब्रिस्बेन : टीम इंडियाने थरारक झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने (Aus vs Ind 4th Test) शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर मालिकाही (Border Gavskar Trophy) जिंकली. टीम इंडियाने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात ही मालिका जिंकली. विशेष म्हणजे रहाणेने अनेक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत नवख्या आणि युवा खेळाडूंना सोबत घेत शानदार विजय मिळवला. टीम इंडियाच्या युवासेनेने कांगारुंना बॅटिंग आणि बोलिंगने चांगलं रडवलं. कांगारुंना झुंज दिली. रहाणेने अनुभवी खेळाडूंशिवाय कसा विजय मिळवला हे आपण पाहणार आहोत. (aus vs ind 4th test captain Ajinkya Rahane took the young players without senior player along to win the series to victory)

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागलं. विराट पहिल्या सामन्यानंतर भारतात परतला. त्यामुळं अजिंक्यकडे नेतृत्वाची जबाबदारी आली. दुखापत टीम इंडियाची पाठ सोडायला तयार नव्हती. त्यात पहिला सामना भारताने गमावला होता. यामुळे टीम इंडिया मालिकेत 1-0 ने पिछाडीवर होती. रहाणेच्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी होती. रहाणेने ही जबाबदारी एक फलंदाज आणि कर्णधार अशी दुहेरी भूमिका सार्थपणे पार पाडली. तसेच त्याने नवख्या खेळाडूंना विश्वासात घेतले. रहाणेने आपल्या सहकाऱ्यांना आपला नैसर्गिक खेळ करण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्याने योग्य वेळी योग्य गोलंदाजीची निवड केली. अचूक फिल्ड सेट केली.

कांगारुंना रोखण्यासाठी रणनिती आखली. ठरलेल्या रणनितीची अंमलबजावणी केली. दुसऱ्या कसोटीत शानदार शतक झळकावलं. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना होता. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात त्याने शतक लगावलं. या शतकासह त्याने अनेक विक्रमही केले. टीम इंडियाकडून बॉक्सिंग डे कसोटीत शतक लगावणारा दुसराच फलंदाज ठरला.

शानदार बोलिंग, बॅटिंग, फिल्डिंग या तिनही आघाड्यावर टीम इंडिया यशस्वी ठरली. यामध्ये रहाणेच्या नेतृत्वाचंही महत्वाचं योगदान राहिलं. यामुळे टीम इंडियाचा बॉक्सिंग डे कसोटीमध्ये विजय झाला.

चौथी कसोटी

चौथ्या कसोटीत थंगारासू नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला संधी मिळाली. विराटच्या तुलनेत अजिंक्य फार शांत आणि संयमी स्वभावाचा आहे. त्याच्या या स्वभावाचा टीम इंडियाच्या नवख्या खेळाडूंना फायदा झाला. अजिंक्यने आपल्या खेळाडूंना वेळोवेळी विश्वास दिला. योग्य वेळी योग्य गोलंदाजाची निवड केली. त्या त्या गोलंदाजाने अजिंक्यचा विश्वास सार्थ ठरवला. त्या त्या गोलंदाजांनी विकेट्स मिळवून दिला.

नटराजन, सुंदर आणि मराठमोळ्या ठाकूरने शानदार कामिगरी केली. विशेष म्हणजे सुंदर आणि ठाकूरने निर्णायक भूमिका बजावली. पहिल्या डावात सुंदर, नटराजन आणि ठाकूरने गोलंदाजी करताना प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

यानंतर सुंदर-ठाकूरने पहिल्या डावात शानदार फलंदाजी केली. टीम इंडिया पहिल्या डावात अडचणीत होती. 6 बाद 186 अशी टीम इंडियाची स्थिती होती. मात्र सुंदर आणि शार्दुलने टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांमधील भागीदारी या चौथ्या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. दोघांनी सातव्या विकेटसाठी123 धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान दोघांनी अर्धशतकं लगावली. शार्दुलने 67 तर सुंदरने 62 धावा केल्या. या दोघांनी केलेल्या खेळीमुळे कांगारुंना दुसऱ्या डावात केवळ 33 धावांची आघाडी मिळाली.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 294 धावांवर गुंडाळले. 33 धावांच्या आघाडीमुळे भारताला 328 धावांचे विजयी आव्हान मिळाले. टीम इंडियाला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. पण दुसऱ्या विकेटसाठी शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने शानदार 114 धावांची भागीदारी केली. यानंतर शुबमन बाद झााला. तो नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. त्याने 91 धावांची खेळी केली. यानंतर कर्णधार रहाणे मैदानात आला. पुजारा आणि रहाणेने काही धावा जोडल्या. मात्र रहाणे 24 धावांवर बाद झाला.

रहाणेनंतर रिषभ पंत मैदानात आला. या दोघांनी 61 धावांची भागीदारी केली. पुजाराने या दरम्यान अर्धशतक लगावलं. पुजारा अत्यतं संथ गतीने खेळत होता. त्यामुळे सामना अनिर्णित राहतो का, असं वाटायला लागलं.

तेवढ्यात पुजारा बाद झाला. पुजाराने 56 धावांची महत्वाची खेळी केली. पुजारानंतर मयांक अग्रवाल खेळायला आला. सामना रंगतदार स्थितीत होता. अगदी टी 20 सामन्यासारखा.

पंतने आवश्यकतेनुसार फटकेबाजी करायला सुरुवात केली. या दोघांनी 37 धावा जोडल्या. मयंक 9 धावांवर आऊट झाला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आला. सुंदरने पहिल्या डावात अर्धशतक लगावलं होतं. त्यामुळे त्याचा विश्वास वाढलेला होता.या दोघांनी इथून आणखी वेगाने धावा केल्या. या दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 53 धावांची महत्वाची भागीदारी केली.

दोघांच्या खेळीमुळे टीम इंडिया विजया जवळ आली. मात्र सुंदर ऐन वेळेस बाद झाला. सुंदरने महत्वपूर्ण 22 धावा केल्या. सुंदरनंतर शार्दुल मैदानात आला. मात्र शार्दुलला लवकर बाद झाला. त्याने 2 धावा केल्या. दरम्यान पंतने विजयी फटका मारत सामन्यासह मालिका विजय मिळवून दिला. पंतने शानदार नाबाद 89 धावा केल्या.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 4th Test, 5th Day Live | लढले, नडले, भिडले, कांगारुंची घमेंड उतरवली, टीम इंडियाचा थरारक विजय

Ajinkya Rahane | नगरच्या मातीची मेलबर्नमध्ये कमाल, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाने राहुल द्रविडची आठवण!

India vs Australia 2020 | कसोटी कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे विराटपेक्षा उत्तम : इयन चॅपल

Aus vs Ind 4th Test | व्हिलन होता होता रिषभ पंत हिरो ठरला, निर्णायक क्षणी गियर बदलला!

(aus vs ind 4th test captain Ajinkya Rahane took the young players without senior player along to win the series to victory)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.