AUS vs IND : कॅप्टन रोहित-विराटचा चौथ्या सामन्याआधी जोरदार सराव, व्हीडिओ व्हायरल

Rohit Sharma And Virat Kohli Nets Practice : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 ते 30 डिसेंबर दरम्यान बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथा कसोटी सामना हा मेलबर्नमध्ये होणार आहे. त्याआधी विराट आणि रोहित या दोघांनी जोरदार सराव केला आहे.

AUS vs IND : कॅप्टन रोहित-विराटचा चौथ्या सामन्याआधी जोरदार सराव, व्हीडिओ व्हायरल
virat kohli and rohit sharmaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Dec 21, 2024 | 11:17 PM

टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीत 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. ही मालिका 3 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. भारताने रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात पर्थमध्ये विजय मिळवला. भारताने यासह मालिकेत विजयी सलामी देत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडलेडमध्ये पलटवार केलाआणि मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यानंतर तिसरा सामना हा पावसामुळे बरोबरीत सुटला. त्यानंतर आता 26 डिसेंबरपासून चौथा सामना हा मेलबर्न येथे होणार आहे.

मेलबर्नमध्ये होणारा सामना हा मालिकेच्या दृष्टीने निर्णायक असणार आहे. चौथा सामना जिंकणारा संघ मालिका गमावणार नाही, हे निश्चित होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चौथ्या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्यासह मालिका पराभव टाळण्याचा आटोकाट प्रयत्न असणार आहे. त्यासाठी भारताचे आजी माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी नेट्समध्ये जोरदार सराव केला आहे. स्टार स्पोर्ट्सने या दोघांच्या सरावाचा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

मेलबर्नमध्ये विराट कामगिरी

दरम्यान विराटची बॅट मेलबर्नमध्ये तळपते, असं त्याचे आकडे म्हणतात. विराटने मेलबर्नमध्ये एकूण 3 कसोटी सामने खेळले आहेत. विराटने त्या 3 सामन्यांमध्ये 2 अर्धशतकं आणि 1 शतकासह 52.66 च्या सरासरीने 316 धावा केल्या आहेत.

मेलबर्न कसोटीआधी रोहित-विराटचा जोरदार सराव

ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रेव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.