Aus vs Ind 4th Test | मोहम्मद सिराजची ‘फाईव्ह’ स्टार कामिगरी, मानाच्या पंगतीत स्थान
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथा कसोटी सामना रंगतदार स्थितीत आहे. टीम इंडियाला पाचव्या दिवशी विजयीसाठी 324 धावांची आवश्यकता आहे.
ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील (Aus vs Ind 4th Test) चौथा कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. टीम इंडियाने चौथ्या दिवसापर्यंत बिनबाद 4 धावा केल्या आहेत. यामुळे सामन्याच्या 5 व्या दिवशी विजयासाठी 324 धावांची आवश्यकता आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 296 धावांवर रोखलं. यामुळे भारताला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले आहे. मोहम्मद सिराजने दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना शानदार कामगिरी केली. त्याने कांगारुंच्या एकूण 5 फलंदाजांना माघारी धाडलं. या कामगिरीसह त्याने मानाच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. (aus vs ind 4th test mohammed siraj become 5th indian bowler who take five wickets in brisbane)
मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांना आऊट केलं. यामध्ये त्याने मार्नस लाबुशेन, मॅथ्यू वेड, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवुड यांना बाद केलं. यासह सिराज हा ब्रिस्बेनवर टीम इंडियाकडून कसोटीत एका डावात 5 विकेट्स घेणारा 5 वा गोलंदाज ठरला.
इरापल्ली प्रसन्ना 104-6, 1968
बिशन सिंह बेदी 5/57, 1977
मदन लाल 5/72 , 1977
झहीर खान 5/95, 2003
मोहम्मद सिराज 5/73, 2021
टीम इंडियाकडून सिराजच्या आधी एकूण 4 गोलंदाजांनी ब्रिस्बेनवर 5 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये इरापल्ली प्रसन्ना, बिशन सिंह बेदी, मदन लाल आणि झहीर खान यांचा समावेश आहे. या माजी गोलंदाजांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत ब्रिस्बेनमध्ये एकाच डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. ब्रिस्बेनवर इरापल्ली प्रसन्ना यांनी टीम इंडियाकडून सर्वात आधी 1968 मध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. प्रसन्नाने 104 धावा देत 6 विकेट्स झटकल्या होत्या.
फनटॅस्टिक फाईव्ह
सिराज ब्रिस्बेनवर कसोटीत 5 विकेट घेणारा 5 वा गोलंदाज ठरला. तसेच सिराजने दुसऱ्या डावात एकूण 19.5 ओव्हर्स टाकल्या. यात त्याने 5 ओव्हर्स या मेडन (निर्धाव) टाकल्या. तसेच रोहित शर्माने या सामन्यातील दोन्ही डावात मिळून एकूण 5 कॅच घेतल्या.
A standing ovation as Mohammed Siraj picks up his maiden 5-wicket haul.#AUSvIND #TeamIndia pic.twitter.com/e0IaVJ3uA8
— BCCI (@BCCI) January 18, 2021
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात ऑल आऊट केलं. यानंतर टीम इंडिया डगआऊटच्या दिशेने निघाली. यावेळेस टीम इंडियाच्या राखीव खेळाडूंनी तसेच इतर सहकाऱ्यांनी सिराजचं बाऊंड्री लाईनवर टाळ्या वाजवत अभिनंदन केलं. तसेच यॉर्कर किंग जस्प्रीत बुमराहाने सिराजला मिठी मारत अभिनंदन केलं.
संबंधित बातम्या :
Aus vs Ind 4th Test | नवखे खेळाडू कांगारुंवर भारी, शोएब अख्तरकडून टीम इंडियाच्या युवासेनेचं कौतुक
(aus vs ind 4th test mohammed siraj become 5th indian bowler who take five wickets in brisbane)