AUS vs IND : टीम इंडिया सिडनीत पर्थची पुनरावृत्ती करणार? दुसऱ्या दिवशी गोलंदाजांकडे लक्ष

Australia vs India Sydney Test Day 2 Preview : ऑस्ट्रेलियाची पहिल्या दिवशी 185 धावांच्या प्रत्युत्तरात 9 बाद 1 अशी धावसंख्या आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांकडून कांगारुंना झटपट रोखावं, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.

AUS vs IND : टीम इंडिया सिडनीत पर्थची पुनरावृत्ती करणार? दुसऱ्या दिवशी गोलंदाजांकडे लक्ष
sam konstas and jasprit bumrah aus vs ind 5th testImage Credit source: Icc X Account
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 8:30 PM

टीम इंडियाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पाचव्या आणि अंतिम सामन्यातील पहिल्या दिवशी पुन्हा एकदा निराशा केली. सलग 3 सामन्यात अपयशी ठरल्याने नियमित कर्णधार रोहित शर्मा याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कर्णधार जसप्रीत बुमराह याने नाणेफेक जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. मात्र ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि अखेरीस जसप्रीत बुमराह या तिघांनी केलेल्या खेळीमुळे टीम इंडियाला 180 पार मजल मारता आली. भारताचा पहिला डाव हा 185 धावांवर आटोपला. पंतने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. जडेजाने 26 तर बुमराहने अखेरीस निर्णायक 22 धावा जोडल्या. त्यानंतर बुमराहने दिवसातील शेवटच्या चेंडूवर उस्मान ख्वाजाला आऊट करत कांगारुंना पहिला झटका दिला. त्यामुळे आता दुसऱ्या दिवसाच्या खेळाकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडिया पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही अशीच ढेर झाली होती. मात्र त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी दणक्यात कमबॅक केलं होतं. ऑस्ट्रेलियाने भारताला 150 धावांवर गुंडाळलं होतं. टीम इंडियाने त्यानंतर कांगारुंना 104 धावांवर रोखत 46 धावांची आघाडी मिळवली होती. त्यामुळे आता पाचव्या कसोटीतही भारतीय गोलंदाजांकडून अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे.

बुमराहला साथ महत्त्वाची

या मालिकेत आतापर्यंत जसप्रीत बुमराह याला दुसऱ्या बाजूने एकाही गोलंदाजांला चांगली साथ देता आलेली नाही. टीम इंडिया या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना ‘करो या मरो’ असा आहे. त्यामुळे हा सामना जिंकायचा असेल तर कांगारुंना झटपट रोखण्याचं आव्हान असणार आहे. बुमराहने पहिल्या डावात 22 धावांच्या खेळीनंतर टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. ओपनर सॅम कोनस्टास याने डिवचल्यानंतर बुमराहने उस्मान ख्वाजा याला दिवसातील शेवटच्या बॉलवर आऊट केलं.

हे सुद्धा वाचा

कोनस्टासने विनाकारण बुमराहला ललकारलं. त्यानंतर बुमराहने ख्वाजाला पुढच्याच आऊट केलं आणि हिशोब क्लिअर केला. शेवटच्या बॉलवर विकेट घेतल्याने टीम इंडियाच्या बाजूने मूमेंटम आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी बुमराहला सहकारी गोलंदाजांची चांगली साथ मिळाली तर ऑस्ट्रेलियाला झटपट गुंडाळण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. त्यामुळे भारतीय गोलंदाजांकडून पर्थप्रमाणेच सिडनीतही दमदार कमबॅकची आशा असणार आहे.

पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.

पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?.