AUS vs IND : यशस्वीचा पहिल्याच ओव्हरमध्ये धमाका, स्टार्कला तोडत सेहवागचा रेकॉर्ड ब्रेक, पाहा व्हीडिओ
Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालने दुसऱ्या डावीतल पहिल्याच ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कच्या बॉलिंगवर 4 चौकार ठोकले. यशस्वीने यासह मोठा विक्रम मोडीत काढला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना हा सिडनीत खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा (4 जानेवारी) खेळ संपला आहे. टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने दुसऱ्या डावात अप्रतिम सुरुवात केली. यशस्वीने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क याला झोडला. यशस्वीने स्टार्कच्या बॉलिंगवर पहिल्याच ओव्हरमध्ये अप्रतिम 4 चौकार लगावले. यशस्वीने यासह पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा कुटल्या आणि टीम इंडियाला कडक सुरुवात करुन दिली. यशस्वीने यासह वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा या दोघांचा विक्रम मोडीत काढला.
टीम इंडियाने 185 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 181 धावांवर रोखलं. भारताने यासह 4 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल ही सलामी जोडी मैदानात आली. यशस्वीने स्ट्राईक घेतली. मिचेल स्टार्कने पहिली ओव्हर टाकली. यशस्वीने पहिला बॉल डॉट केला. त्यानंतर 3 बॉलमध्ये 3 फोर ठोकले. यशस्वीने त्यानंतर पाचवा बॉल डॉट केला आणि सहाव्या बॉलवर पुन्हा फोर लगावला. यशस्वीने अशाप्रकारे 16 धावा केल्या.
यशस्वी यासह टीम इंडियासाठी पहिल्याच ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. यशस्वीने सेहवाग आणि रोहित शर्माला मागे टाकलं. सेहवागने 2005 साली मोहम्मद खलील याला 13 धावा ठोकल्या होत्या. तर रोहितशर्मा याने 2023 साली रोहित शर्माने पॅट कमिन्सच्या ओव्हरमध्ये 13 धावा केल्या होत्या.
यशस्वीला चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र यशस्वी 22 धावांवर बाद झाला. यशस्वीला स्कॉट बोलँडने क्लिन बोल्ड केलं.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.