IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 369 धावांवर आटोपला, नवख्या गोलंदाजांची दमदार कामगिरी

बॉर्डर-गावसकर मालिकेतील (Border Gavskar Trophy) चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील 'द गाबा' या मैदानात खेळवला जात आहे. या सामन्यातील ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 369 धावांवर आटोपला आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 369 धावांवर आटोपला, नवख्या गोलंदाजांची दमदार कामगिरी
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 10:34 AM

ब्रिस्बेन : बॉर्डर-गावसकर मालिकेतील (Border Gavskar Trophy) चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील ‘द गाबा’ या मैदानात खेळवला जात आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस आहे. कालच्या 5 बाद 274 धावसंख्येनंतर आज सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने धावफलकावर आरामात त्रिशतक झळकावलं. काल खेळ संपला तेव्हा नाबाद असलेल्या कॅमरॉन ग्रीन आणि कर्णधार टीम पेन या दोघांनी 98 धावांची भागिदारी रचत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच केली. परंतु आजच्या दिवसातील सुरुवातीच्या 12 षटकानंतर भारतीय गोलंदाजांनी गियर बदलला. 99 षटकात 5 बाद 310 वर असलेल्या ऑस्ट्रेलियाची 102 षटकात 8 बाद 315 अशी अवस्था केली. त्यानंतर नेथन लायन आणि मिचेल स्टार्कने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली, मात्र वॉशिंग्टन सुंदरने लायनला माघारी धाडले. त्यानंतर 369 धावांवर भारताला दहावं यश मिळालं. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबूशेनने सर्वाधिक 108 धावांचं योगदान दिलं. तर भारताकडून वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजला एक विकेट घेता आली. (AUS vs IND : Australia all out for 369 Runs in first Inning of Brisbane Test)

तत्पूर्वी, काल ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कांगारुंनी पहिल्या 2 विकेट्स झटपट गमावल्या. फलंदाजीसाठी आलेल्या कांगारुंना मोहम्मद सिराजने पहिल्या ओव्हरमध्ये पहिला झटका दिला. सिराजने डेव्हिड वॉर्नरला रोहित शर्माच्या हाती 4 धावांवर कॅच आऊट केलं. यानंतर शार्दूल ठाकूरने मार्कस हॅरिसला 5 धावांवर आऊट केलं. यानंतर मार्नल लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. ही जोडी तोडायला वॉशिंग्टन सुंदरला यश आले. सुंदरने स्टीव्ह स्मिथला 36 धावांवर रोहित शर्माच्या हाती झेलबाद केलं.

चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

स्मिथ बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची 3 बाद 87 अशी अवस्था झाली. मात्र यानंतर लाबुशेन आणि मॅथ्यू वेडने चौथ्या विकेटसाठी शानदार भागीदारी केली. या दोघांनी शतकी भागीदारी केली. या दरम्यान मार्नस लाबुशेनने शतक झळकावलं. ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. लाबुशेन आणि मॅथ्यू वेडने चौथ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. यानंतर टी नटराजनने ही जोडी फोडली. नटराजनने मॅथ्यू वेडला 45 धावांवर बाद केलं. वेड बाद झाल्यानंतर कॅमरॉन ग्रीन मैदानात आला. मार्नस लाबुशेन शतकी खेळीनंतर बाद झाला. नटराजनने लाबुशेनला 108 धावांवर रिषभ पंतच्या हाती झेल द्यायला भाग पाडलं. लाबुशेनने 204 चेंडूत 9 चौकारांसह 108 धावा केल्या.

सकाळच्या सत्रात पेन-ग्रीन जोडीचा सावध खेळ

लाबुशेन बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 4 बाद 200 अशी झाली. त्यानंतर कॅमरॉन ग्रीन आणि कर्णधार टीम पेनने डाव सावरला. या दोघांनी दिवसखेर नाबाद 61 धावांची भागीदारी केली होती. आज या दोघांनी यामध्ये अजून 37 धावा जोडल्या. आज सकाळच्या सत्रात जलदगती गोलंदाज शार्दूल ठाकूरने ही जोडी फोडली. शार्दुलने टीम पेनला 50 धावांवर असताना रोहित शर्माकरवी झेलबाद केलं. पाठोपाठ वॉशिंग्टन सुंदरने कॅमरॉन ग्रीनला (47) बोल्ड केलं. त्यानंतर शार्दुल ठाकूरने पॅट कमिंसला पायचित (LBW) पकडून ऑस्ट्रेलियाचा आठवा गडी तंबूत धाडला. कमिंसला केवळ दोन धावा करता आल्या.

नेथन लायन-मिचेल स्टार्कचा धुडगूस

आठ गडी तंबूत परतल्यानंतर उरलेले दोन खेळाडू लवकर बाद होतील असा अंदाज भारतीय प्रेक्षकांना होता. परंतु 8 विकेट गेल्यानंतर मैदानात असलेल्या मिचेल स्टार्क आणि नेथन लायन यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई सुरु केली. दोघांनी 6.4 षटकांमध्ये 39 धावा फटकावल्या. नेथन लायनने 22 चेंडूत 4 चौकारांच्या सहाय्याने 24 धावा फटकावल्या. वॉशिंग्टन सुंदरने लायनला बोल्ड आऊट करत टीम इंडियाला नववं यश मिळवून दिलं. त्यानंतर मिचेल स्टार्क आणि जॉश हेजलवूड या जोडीने काही धावा जोडल्या. ही जोडी फोडण्यासाठी टी. नटराजनला मैदानात यावं लागलं. नटराजनने जोश हेजलवूडला बाद करत ही जोडली फोडली तसेच ऑस्ट्रेलियाचा डाव 369 धावांवर संपुष्टात आणला.

संबंधित बातम्या

ऑस्ट्रेलियाचे प्रेक्षक सुधरेनात, ब्रिस्बेनमध्ये सिराज आणि सुंदरला शिव्या

क्रिकेट खेळतोय की आबाधुबी? पृथ्वीने फेकलेला चेंडू रोहितच्या हातावर आदळला, आणि….

टीम इंडियामागे दुखापतींचं ग्रहण कायम, आता ‘या’ खेळाडूला दुखापत

(AUS vs IND : Australia all out for 369 Runs in first Inning of Brisbane Test)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.