AUS vs IND : चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया जाणार? असं असेल हवामान
Australia vs India 3rd Test Day 4 Weather Report: टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने आतापर्यंत व्हिलनची भूमिका बजावली आहे. त्यामुळे चौथ्या दिवसही पाऊस खोडा घालणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील तिसरा सामना हा गाबा, ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येत आहे. सामन्यातील पहिल्याच दिवशी पावसाने खोडा घातला. पहिल्या दिवशी फक्त 13.2 ओव्हरचाच खेळ होऊ शकला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळ झाला. मात्र तिसऱ्या दिवशी (16 डिसेंबरला) पावसाने पुन्हा एन्ट्री घेतली. त्यामुळे आता चौथ्या दिवशीही पाऊस पुन्हा खोडा घालणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. त्यानिमित्ताने आपण चौथ्या दिवशी ब्रिस्बेनमध्ये हवामान कसं असेल? पावसाची किती शक्यता आहे? हे जाणून घेऊयात.
तिसऱ्या दिवशी पावसामुळे फक्त 33.1 ओव्हरचाच खेळ होऊ शकला. तिसऱ्या दिवशी पावसामुळे 8 वेळा खेळात व्यत्यय आला. तर पावसानंतर खराब प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तिसऱ्या दिवशीही पूर्ण खेळ होऊ शकला नाही
कसं असेल हवामान?
ब्रिस्बेनमध्ये चौथ्या दिवशी पावसाचा कहर पाहायला मिळू शकतो. एक्युवेदरनुसार, चौथ्या दिवशी पाऊस होण्याची 100 टक्के शक्यता आहे. त्यामुळे चौथ्या दिवसाचा संपूर्ण खेळ वाया जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी ब्रिस्बेनमध्ये कमाल तापमान 31 तर किमान 25 अशं सेल्सियस असण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया बॅकफुटवर
दरम्यान टीम इंडिया या सामन्यात बॅकफुटवर आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 445 धावा केल्या. तर प्रत्युत्तरात तिसर्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तोवर टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून 51 धावा केल्या. केएल राहुल 33 धावांवर नाबाद आहे. तर रोहितला अजून खातंही उघडता आलेलं नाही. त्यामुळे टीम इंडिया 394 धावांनी पिछाडीवर आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेझलवूड.
तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नीतीश कुमार रेड्डी.