AUS vs IND Test Series : टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यांसाठी झोपमोड करावी लागणार, पाहा वेळापत्रक

Australia vs India Test Series 2024 2025 Live Streaming : टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 22 नोव्हेंबरपासून 5 कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. हे सामने कुठे पाहता येतील? हे सर्वकाही जाणून घ्या.

AUS vs IND Test Series : टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यांसाठी झोपमोड करावी लागणार, पाहा वेळापत्रक
rohit sharma vs pat cummins india vs australia test seriesImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 2:12 PM

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडियाची जोरात तयारी सुरु आहे. टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलियात पोहचल्यापासून कसून सराव करत आहे. उभयसंघात एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील तिसऱ्या साखळीचा भाग आहे. पॅट कमिन्स या मालिकेत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. मात्र रोहित पहिल्या कसोटीत खेळणार की नाही? याबाबत साशंकता आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया या मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना या मालिकेतील सर्व सामने सुरुवातीपासून पाहायचे असतील तर झोपेसह तडजोड करावी लागणार आहे. या मालिकेतील संपूर्ण सामन्यांना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरुवात होणार? तसेच सामने कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिकेला केव्हापासून सुरुवात होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील सर्व सामने टीव्हीवर कुठे पाहायला मिळतील?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील सर्व सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील सामने मोबाईलवर कुठे पाहता येणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील सामने मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहता येतील.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं वेळापत्रक

पहिला सामना, 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ, सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी

दुसरा सामना, 6 ते 10 डिसेंबर, एडलेड ओव्हल, (डे-नाईट), सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी

तिसरा सामना, 14 ते 18 डिसेंबर, गाबा, पहाटे 5 वाजून 50 मिनिटांनी

चौथा सामना, 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न, पहाटे 5 वाजता.

पाचवा सामना, 3 ते 7 जानेवारी, सिडनी, पहाटे 5 वाजता.

पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.

Non Stop LIVE Update
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा.
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी.
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा.
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली.