BGT Head To Head : टीम इंडियाने किती वेळा उंचावलीय बॉर्डर गावसकर ट्रॉफी? ऑस्ट्रेलियाची कामगिरी कशी?
Australia vs India Border Gavaskar Trophy : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 17 व्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेला 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरुवात होणार आहे. या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत आतापर्यंत कोण वरचढ राहिलं आहे? जाणून घ्या.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत एकूण 5 सामने होणार आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच मालिकेत 5 सामने होणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 1996 पासून बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धा खेळवण्यात येत आहे. उभयसंघ बॉर्डर गावकर ट्रॉफीत आतापर्यंत एकूण 16 वेळा भिडले आहेत. टीम इंडियाचा यामध्ये बोलबाला राहिला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत 10 वेळा धुव्वा उडवला आहेत. ऑस्ट्रेलियाने 5 वेळा या ट्रॉफीवर नाव कोरलंय. तर 1 सीरिज ड्रॉ राहिली आहे. टीम इंडियाने गेल्या 5 पैकी 4 वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे.
टीम इंडियाचा विजयी चौकार
ऑस्ट्रेलियाने मायदेशात 2014-2015 मध्ये मायदेशात अखेरीस ही ट्रॉफी जिंकली होती. टीम इंडियाने त्यानंतर सलग 4 वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियाने 2 वेळा भारतात तर 2 वेळा ऑस्ट्रेलियात सीरिज जिंकत ही ट्रॉफी उंचावली आहे. त्यामुळे यंदा टीम इंडिया सलग पाचव्यांदा ही ट्रॉफी जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मिशन WTC फायनल
दरम्यान टीम इंडियाला सलग आणि एकूण तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकावी लागणार आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला मायदेशातच 3-0 ने व्हाईटवॉश केलं. त्यामुळे टीम इंडियासमोर बॉर्डर गावसकर ट्रॉफी 4-1 ने जिंकण्याचं आव्हान असणार आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं वेळापत्रक
पहिला सामना, 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ, सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी
दुसरा सामना, 6 ते 10 डिसेंबर, एडलेड ओव्हल, (डे-नाईट), सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी
तिसरा सामना, 14 ते 18 डिसेंबर, गाबा, पहाटे 5 वाजून 50 मिनिटांनी
चौथा सामना, 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न, पहाटे 5 वाजता.
पाचवा सामना, 3 ते 7 जानेवारी, सिडनी, पहाटे 5 वाजता.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.