IND vs AUS : रोहितसाठी हे दोघे पर्याय, फ्लॉप केएल पहिली पसंत, गंभीरने या खेळाडूला दुखावलं

Gautam Gambhir Team India vs Australia : रोहित शर्माच्या अनुपस्थितीत गौतम गंभीरने 2 खेळाडूंचा पर्याय म्हणून विचार केला आहे. मात्र धावा करणाऱ्या खेळाडूचा विचार केला गेला नाही.

IND vs AUS : रोहितसाठी हे दोघे पर्याय, फ्लॉप केएल पहिली पसंत, गंभीरने या खेळाडूला दुखावलं
gautam gambhir press conference
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 11:23 AM

टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत पराभूत झाल्यानंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. तर दुसरी तुकडी लवकरच रवाना होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 22 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. याआधी हेड कोच गौतम गंभीर याने पत्रकार परिषद घेत नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या उपस्थितीबाबत सुरु असणाऱ्या चर्चांबाबत माहिती दिली. रोहितच्या अनुपस्थितीत कॅप्टन कोण असणार? तसेच रोहितच्या जागी कुणाचा समावेश केला जाणार? हे देखील गंभीरने स्पष्ट केलं.

उभयसंघात पहिला कसोटी सामना हा पर्थ येथे होणार आहे. मात्र रोहित पहिल्या सामन्यात खेळणार की नाही? याचं स्पष्ट उत्तर गौतम गंभीर यालाही देता आलं नाही. त्यामुळे रोहित खेळणार की नाही? हे सामन्याआधी टॉसवेळेसच स्पष्ट होईल. तसेच रोहित जर खेळणार नसेल तर त्याच्या जागी कॅप्टन कोण असणार? तसेच रोहितच्या जागी कुणाला संधी मिळणार? हे गंभीरने सांगितलं.

गंभीर काय म्हणाला?

रोहित खेळणार की नाही हे तेव्हाच स्पष्ट होईल. मात्र जर रोहित खेळणार नसेल तर उपकर्णधार या नात्याने जसप्रीत बुमराह सूत्र सांभाळेल, असं गंभीरने स्पष्ट केलं. तसेच रोहितच्या जागी अभिमन्यू ईश्वरन आणि केएल राहुल हे दोघे पर्याय असतील, असंही गंभीरने नमूद केलं. गंभीरच्या या घोषणेमुळे भारताचा युवा विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेल याचं मन कुठेतरी दुखावलं असणार हे निश्चित.

ध्रुव प्रबळ दावेदार

रोहितच्या जागेसाठी ध्रुव प्रबळ दावेदार होता. ध्रुव आणि केएलचा ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यासाठी टीम इंडिया ए मध्ये समावेश करण्यात आला होता. केएल दोन्ही डावात अपयशी ठरला होता. मात्र ध्रुव जुरेल याने दोन्ही डावात अर्धशतकी खेळी करत टीम इंडियाला लाजीरवाण्या पराभवापासून बचावलं. मात्र त्यानंतरही ध्रुवच्या नावाचा विचार न करता अभिमन्यू आणि फ्लॉप केएल या दोघांना पसंती दिली गेली आहे.

पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.