IND vs AUS: कॅप्टन मिचेल मार्शची रोहितबाबत प्रामाणिक कबूली, ही बाब मान्य करावीच लागली, म्हणाला…
Mitchell Marsh On Rohit Sharma: मिचेल मार्शच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला टीम इंडिया विरुद्ध पराभूत व्हावं लागलं. मिचेल मार्शने सामन्यानंतर टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरलेल्या कॅप्टन रोहित शर्माबद्दल प्रतिक्रिया दिली.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 मध्ये टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्मा याच्या 92 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. तर ऑस्ट्रेलियाची स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आणखी वाढली आहे. ऑस्ट्रेलियाने सुपर 8 मधील 3 पैकी 2 सामने गमावले आहेत. ऑस्ट्रेलियाने एकमेव सामना बांगलादेश विरुद्ध जिंकला आहे. तर टीम इंडिया विरूद्धच्या सामन्याआधी अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्याने कांगारुंची स्थिची आणखी वाईट झाली आहे. वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनने सामन्यानंतर रोहित शर्माबाबत प्रतिक्रिया दिली.
मिचेल मार्श काय म्हणाला?
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र कांगारुंना 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 171 धावाच करता आल्या. पराभवानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटशनमध्ये मार्शने प्रतिक्रिया दिली. आम्ही गेल्या 15 वर्षांपासून रोहितचा मूड पाहत आहोत की तो त्याचा दिवस असल्यावर काय करु शकतो. रोहितने शानदार सुरुवात केली. अशाप्रकारच्या चेसिंगमध्ये शक्य तेवढं 10 पर्यंत रनरेट कायम ठेवू शकता, तेव्हाच तुम्ही जिंकू शकता, मात्र भारताने चांगला खेळ केला”, असं मिचेलने म्हटलं.
“हे फार निराशाजनक होतं. तांत्रिकदृष्ट्या पुढे जाण्याची संधी होती. टीम इंडियाने आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली. मात्र प्रामाणिकपणे सांगायचं तर टीम इंडिया आमच्यापेक्षा सरस होती”, असं मार्शने कबूल केलं.
दरम्यान आता टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध सामना होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड 2 वर्षांपूर्वीही अशीच लढत टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये झाली होती. तेव्हा टीम इंडियाला पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे आता रोहितसेनेने ऑस्ट्रेलियानंतर इंग्रजांना पराभूत करत हिशोब चुकता करावा, अशी इच्छा आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन: मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.