IND vs AUS : टीम इंडियासमोरील चिंता वाढल्या, दुखापतग्रस्त नवदीप सैनी स्कॅनिंगसाठी रुग्णालयात
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या मागे लागलेलं दुखापतींचं ग्रहण अद्याप सुटलेलं नाही.
ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या मागे लागलेलं दुखापतींचं ग्रहण अद्याप सुटलेलं नाही. सर्वच प्रमुख गोलंदाज आणि काही फलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने कप्तान अजिंक्य रहाणे आणि संघ व्यवस्थापनाने नवोदित खेळाडूंसह नवा संघ उभारला आणि टीम इंडिया ब्रिस्बेनच्या मैदानात उतरली. परंतु चौथ्या कसोटी सामन्यात भारताला आणखी एक धक्का बसला. कारकीर्दीतला दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या नवदीप सैनीला सामन्यातील पहिल्याच दिवशी दुसऱ्या सत्रात गोलंदाजी करताना दुखापत झाली. 7.5 षटकं गोलंदाजी करुन त्याने मैदान सोडलं. दुखापतीमधून सावरत तो आज मैदानात परतेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. परंतु तसे झाले नाही. नवदीप सैनीला स्कॅनिंगसाठी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती दिली आहे. (AUS VS IND : Navdeep Saini taken for scans after suffering groin strain says BCCI)
UPDATE – Navdeep Saini has now gone for scans.#AUSvIND https://t.co/pN01PVnFfx
— BCCI (@BCCI) January 15, 2021
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा पुढील काळात दुखापतींचा दौरा म्हणून ओळखला जाणार आहे. कारण या दौऱ्यात आणि दौऱ्यापूर्वी गेल्या दोन महिन्यात भारताचे तब्बल 12 खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात (ब्रिस्बेन कसोटी) भारतीय संघात अर्ध्याहून अधिक खेळाडू नवखे आहेत. त्यातही प्रामुख्याने भारताचे पाचही गोलंदाज नवोदित आहे. या पाचपैकी एकाही गोलंदाजाने दोनपेक्षा अधिक कसोटी सामने खेळलेले नाहीत. दरम्यान दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी चार नव्या खेळाडूंना चौथ्या कसोटी सामन्यात संधी देण्यात आली आहे. या सामन्यात भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भारताचा प्रमुख फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनदेखील नाही. तसेच सिडनी कसोटीचा हिरो हनुमा विहारी आणि अष्टपैलू रवींद्र जाडेजा यांना आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याजागी नवोदित खेळाडूंना आजच्या सामन्यात संधी देण्यात आली आहे. त्यातच आता टीम इंडियाच्या चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. नवोदित गोलंदाज नवदीप सैनीला ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात गोलंदाजी करताना दुखापत झाली आहे. त्यामुळे 7.5 षटकं गोलंदाजी करुन त्याने मैदान सोडलं होतं.
? Bowler’s name?
Rohit Sharma into the attack. #AUSvIND pic.twitter.com/BviAdv64Cv
— ICC (@ICC) January 15, 2021
दरम्यान, काल (15 जानेवारी) सैनीच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयने ट्विटरवरुन माहिती दिली होती. बीसीसीआयने ट्विट केलं होतं की, “नवदीप सैनीच्या मांडीचे स्नायू दुखावले आहेत, सध्या त्याच्यावर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाद्वारे देखरेख केली जात आहे.” सैनीने दुखापतीमुळे मैदान सोडले. त्याने आठव्या षटकातील पाच चेंडू टाकले होते, परंतु अखेरचा चेंडू तो टाकू शकला नाही. त्यामुळे त्याचं षटक पूर्ण करण्याची जबाबदारी कर्णधार अजिंक्य रहाणेने उपकर्णधार रोहित शर्मावर सोपवली. सैनीला ब्रिस्बेन कसोटी सामन्यात एकही बळी मिळवता आला नाही. परंतु त्याने कसलेली गोलंदाजी केली होती. त्याने 7.5 षटकांपैकी 2 षटकं निर्धाव टाकत केवळ 21 धावा दिल्या होत्या.
सिडनी कसोटी सामन्यात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारी दुखापतग्रस्त झाले होते. या दोन्ही खेळाडूंना चौथ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. तसेच दोघेही इंग्लंविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहेत. जाडेजाचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे, तर हनुमा विहारीच्या मांडीचे स्नायू दुखावले आहेत. त्यामुळे आता रवींद्र जाडेजाऐवजी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे, तर हनुमा विहारीच्या जागी मयंक अग्रवालला संधी देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
ऑस्ट्रेलियाचे प्रेक्षक सुधरेनात, ब्रिस्बेनमध्ये सिराज आणि सुंदरला शिव्या
क्रिकेट खेळतोय की आबाधुबी? पृथ्वीने फेकलेला चेंडू रोहितच्या हातावर आदळला, आणि….
(AUS VS IND : Navdeep Saini taken for scans after suffering groin strain says BCCI)