AUS vs IND Live Streaming: ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाचं आव्हान, सामना कुठे?
Australia vs India Super 8 T20 World Cup 2024 Live Match Score: ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही अखेरची संधी आहे. टीम इंडिया विरुद्धचा सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवणं बंधनकारक आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडियाने साखळी फेरीनंतर सुपर 8 मध्ये विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. तर सुपर 8 मध्ये बांगलादेशला पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागला. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी टीम इंडिया विरुद्धचा सुपर 8 मधील सामना हा अटीतटीचा असणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर मिचेल मार्श कांगारुंची सूत्रं सांभाळणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामना केव्हा आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामना केव्हा?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामना सोमवारी 24 जून रोजी होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामना कुठे?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामना डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, ग्रोस आइलेट, सेंट लुसिया येथे होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर आणि डीडी स्पोर्ट्सवर पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया टीम: मिचेल मार्श (कॅप्टन), ॲश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर आणि एडम झाम्पा.
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.